महिला ग्राम महसूल अधिकार्यांचा विनयभंग : पोलीस पाटला विरोधात गुन्हा दाखल..
यावल दि.९ (सुरेश पाटील) – पोलीस पाटलाने एका गावातील ३३ वर्षीय महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल तालुक्यातील बामणोद – अकलूद रस्त्यादरम्यान पाठलाग केला.त्या शासकीय काम करत असतांना अटकाव करून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने फिर्याद दिल्यावर सोमवारी रात्री पोलीस पाटलाविरुद्ध विनयभंग सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तहसीलदारांनी या पोलीस पाटलाच्या निलंबनाचा प्रस्ताव देखील प्रांताकडे सादर केला आहे.
पोलीस पाटलाविरोधात गुन्हा
भोरटेक,ता.यावल येथील पोलीस पाटील धनराज गोंडू कोळी यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात ३३ वर्षीय महिला ग्राम महसूल अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १३ फेब्रुवारी २०२५ पासून ते ७ एप्रिल २०२५ या कालावधी दरम्यान सदर महिला अधिकारी या बामनोद ते अकलूद या रस्त्याने जात असतांना पोलीस पाटील धनराज कोळी याने सतत त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर त्या कार्यालयात जात असतांना कार्यालयात येऊन त्यांच्या शासकीय कामात तो सतत अडथळा निर्माण केला आणि त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य तो करत असे.
दरम्यान सतत त्याच्या या अशा कृत्यामुळे महिला अधिकारी या त्रस्त झाल्या होत्या.तेव्हा त्यांनी वरिष्ठांना याबाबत सांगितले आणि वरिष्ठांनी या प्रकाराची गंभीर दाखल घेत फैजपूर पोलीस ठाण्यात संबंधित पोलीसपाटला विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.महिला अधिकारी यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात पोलीस पाटील धनराज कोळी याच्याविरुद्ध विनयभंग विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला. तपास साहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार मोती पवार करीत आहे.