CEO मिनल करनवाल यांची शाळांना अचानक भेट..
विद्यार्थ्यांसोबत शालेय पोषण आहाराची चाखली चव.
जळगाव (प्रतिनिधी) दि.१५ -जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी मंगळवार दिनांक 15 एप्रिल रोजी भुसावल तालुक्यातील विविध गावांना भेट देत घरकुलाचे बांधकाम, तसेच ग्रामपंचायत इमारतींची पाहणी करून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची चव चाखली.यावेळी त्यांच्यासमवेत भुसावळ गटविकास अधिकारी सचिन पानझडे उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांनी मंगळवार दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळ सत्रात भुसावळ तालुक्यातील किन्ही व साकरी या गावांना अचानक भेट देऊन तेथील ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली. त्यासोबतच दोन्ही ठिकाणच्या प्राथमिक शाळा तसेच गावात सुरू असलेल्या घरकुल बांधकामांना भेट देऊन पाहणी केली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांनी शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेत त्याबाबत सुरू असलेल्या अंमलबजावणी संदर्भातले आढावा घेतला.
यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे संवाद साधत जमिनीवर बसून विद्यार्थ्यांमध्ये मिसळत शालेय पोषण आहाराची चव चाखली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे व दर्जा देखील उंचावला पाहिजे या दृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न करण्यासोबत विविध उपक्रम राबवण्याबाबत देखील त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
ईतर महत्वाच्या बातम्या
20 हजाराची लाच : शहर पोलीस स्टेशनचे दोघ लाचखोर हवालदार ACB च्या जाळ्यात..