45 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण : अवघ्या 12 तासात अपहरणकर्त्यांच्या LCB ने आवळल्या मुसक्या..

चाळीसगाव – दि. ३० रोजी अनिल गणेश राठोड रा. वाघले ता. चाळीसगांव जि. जळगांव याचे वडील गणेश ताराचंद राठोड वय-४२ रा वाघले यांचे अनोळखी लोकांनी अपहरण केले असुन त्याचे सुटकेसाठी ४५ लाख रुपयेची खंडणी मागत असल्याची फिर्याद दिली होती. सदर फिर्याद वरुन चाळीसगांव ग्रामीण पोस्टे येथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी हे अपहरण केलेल्या व्यक्तीस मारहाण करतानाचे व्हीडीओ टाकुन तसेच व्हाईस कॉल करुन पैसे तात्काळ देण्याची धमकी देत होते. यातील अपहरण केलला इसमाचे नक्की कोठुन अपहरण झाले आहे याबाबत काहीही पुरावा मिळून येत नव्हता, सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहुन तो उपडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी स्थानीक गुन्हे शाखा पथकास सुचित केले होते.
तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून नेमण्यात आलेल्या पथकाने तांत्रीक विश्लेषण व गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी १) जयेश दत्तात्रय शिंदे, वय-२८ रा.सैनिक कॉलनी चाळीसगांव, २) श्रावण पुंडलिक भागोरे, रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, नांदगाव जि.नाशिक यांची नावे निष्पन्न केली. त्यांचे ठावठिकाणाबाबत माहीती घेतली असता ते मौजे मोझर्ण ता. नांदगाव परिसरात असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. तेव्हा पथकाकडुन त्यांचा शोध घेत असताना आरोपी हे मनमाड रेल्वेस्टेशनकडे मोटार सायकलवरुन जात असल्याची माहीती मिळाली. आरोपींच्या मोटार सायकलचा पाठलाग करत असताना पोलीस गाडी पाहून सदर आरोपी हे मोटार सायकल रस्त्यावर सोडुन रस्त्यालगतच्या शेतामधुन पळुन जाता दिसले. सदर आरोपी यांचा सुमारे ५ किलोमिटर पाठलाग करुन त्यांना पकडण्यात आले. ताब्यात घेवून त्यांना विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, आमचे मित्र जनार्दन बाळु आवारे उर्फ राजू पाटील रा शिंदी ता चाळीसगांव ह. मु. डोंबीवली जि. ठाणे व त्याचा मित्र सोनु भाऊ पूर्ण नाव माहित नाही,रा. मुंबई यांच्या सांगण्यावरुन आम्ही गणेश ताराचंद राठोड यांचे अपहरण केले होते व त्यांना मारहाण करुन त्यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ त्यांच्याच मोबाईल वरुन त्यांचा मुलगा अनिल गणेश राठोड याला पाठवित होतो व गणेश ताराचंद राठोड याला सोडण्यासाठी त्याच्या मुलाकडे ४५ लाख रुपयांची खंडणी मागीतली होती, अपहरण केलेल्या गणेश ताराचंद राठोड यांना चाळीसगांव तालुक्यातील पाटणा गावाचे परिसरात एका शेतातील शेड मध्ये डांबून ठेवून त्यांस मारहाण केली अशी हकिगत आरोपी यांनी सांगीतली. त्यानंतर सदर गुन्हयातील आरोपी यांनी अपहरण केलेल्या पिडीत व्यक्तीला विचुर, लासलगाव येथील जंगलात सोडुन देवून उर्वरित दोन आरोपी हे तेथून फरार झाले. त्यांना पथकाने सदर पिडीत व्यक्तीचा लासलगांव जंगलामध्ये शोध घेतला असता जखमी अवस्थेत पिडीत गणेश ताराचंद राठोड हे मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवून दोन आरोपी सह त्यांना चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले.
सदरची कारवाई महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक, स्थागुशा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि शेखर डोमोळे, पोह संदीप पाटील, पोह मुरलीधर धनगर, पोकों महेश पाटील, पोको सागर पाटील, पोको भूषण शेलार, पोकों ईश्वर पाटील, पोकों भुषण पाटील, पोको जितेंद्र पाटील, चापोह दिपक चौधरी सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांच्या पथकाने केली.