राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची धडक कारवाई : परराज्यातील मद्याची अवैधरित्या विक्री करणा-याच्या आवळल्या मुसक्या..

चाळीसगाव – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दि १९ रोजी चाळीसगाव तालुक्यातील अलवाडी तौरमली वस्तीतील एका घरात छापा टाकला असता सदर ठिकाणी गोवा राज्य निर्मित व विक्री करीता असलेल्या विदेशी दारुच्या विविध ब्रन्डच्या बाटल्या, आणि महाराष्ट्र राज्यात विक्री करीता असलेले रेडीमेड लेबल व बूच स्वतःजवळ बाळगून त्या बाटल्यांवर महाराष्ट्र राज्यात विक्री करीता असलेल्या विविध ब्रन्डचे लेबल लावतांना गौतम लक्ष्मण गरुड हा इसम सापडला.त्याच्या जवळून २,२५.१६६/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला.सदर आरोपीकडून आणखी काही नावे तपासात पुढे येण्याची शक्यता आहे.

सदर कारवाई
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, व्ही टी भुकन यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक अशोक प्र. तारु , राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जळगांव किशोर गायकवाड निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क चाळीसगाव जवान व्ही यी परदेशी व वाय वाय सुर्यवंशी, दुय्यम निरीक्षक, भरारी पथक, वाय सुर्यवंशी, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक जळगाव, एन की पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, जवान-नि-वाहनचालक आर टी सोनवणे, जवान श्री एन बी पवार, आर पी सोनवणे, व्ही डी हाटकर, जवान पी एस पाटील यांनी केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागा तर्फे जनतेस आवाहन करण्यात येते को. अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक वा संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व व्हॉटस्अप क्रमांक ८४२२००११३३ यावर संपर्क साधावा.