अमन तडवी ची १२ वी विज्ञान शाखेत 71.83 गुणांसह यशाची झेप
रावेर हमीद तडवी – जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका येथील कुसुंबा बु. या आदिवासी बहुल गावातल्या अमन हमीद तडवी या नुतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिनावल कॉलेजच्या विद्यार्थ्याने १२ वी विज्ञान या शाखेत ७१.८३ टक्के गुण मिळवून आपल्या मेहनतीची आणि चिकाटीची प्रत्यक्षात प्रचीती दिली आहे. अमनला मिळालेले गुण हे कदाचित टॉपरसारखे भासणार नाहीत, पण अमनच्या संघर्षमय पार्श्वभूमीला पाहता हे यश खर्या अर्थाने उल्लेखनीय आहे. साधनसंपन्नतेअभावी आणि आव्हानात्मक परिस्थितीतही प्रयत्न न थांबवता त्याने हे यश मिळवले आहे. यश मोजण्याचे एकमेव माप गुण नसून, त्या यशामागील संघर्ष आणि जिद्द हेच खरे मोलाचे असते, हे त्याने दाखवून दिले आहे. अमनचे हे यश ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.
अमनच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण कुटुंब, नातेवाईक, शिक्षक, मित्रपरिवार, पत्रकार तसेच गावातील नागरिकांकडून त्याचे अभिनंदन केले जात असुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.अमन हमीद तडवी हा मीडिया पोलिस टाईम्स चे मुख्य संपादक, तसेच दैनिक रोख ठोक, दैनिक दवंडी, दैनिक लोकदिशा आणि विशेष तपास न्यूज चे जिल्हा ब्युरो चीफ असलेल्या हमीद तडवी यांचा सुपुत्र आहे. वडिलांचा पत्रकारितेतील अनुभव आणि समाजसेवेची प्रेरणा अमनच्या यशामागे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे अमनने सांगितले आहे.