यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत बांधकाम कामगारांची वस्तू संच घेण्यासाठी मोठी गर्दी..
वस्तू संच देण्यासाठी प्रत्येक मंडळात व्यवस्था हवी.

यावल दि.२० – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईतर्फे इमारत व इतर बांधकाम कामगारांना घरगुती वापरासाठी ३० नगाचा वस्तू संच मिळत असल्याने त्याचे कुपन आणि टोकन घेण्यासाठी यावल कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गेल्या दोन-तीन दिवसापासून मोठी गर्दी होत आहे.गर्दीमुळे महिलांना, पुरुष कामगारांना रांगेत उभे राहण्यासाठी कामधंदा सोडून मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने वस्तू वाटप व्यवस्था प्रत्येक महसूल मंडळात केल्यास इमारत व इतर बांधकाम कामगारांना सोयीचे होईल असे बांधकाम कामगारांमध्ये बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्यातर्फे वितरित करण्यात येणाऱ्या वस्तू संच ३० नग मला सुस्थितीत प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळालेला नाही किंवा ते घेणार नाहीत त्याच प्रमाणे मला सदर संचाचे दुबार वाटप झालेले नाही भविष्यात अशी आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाई वसुलीस मी व माझे कुटुंबातील सदस्य पात्र जबाबदार राहतील अशा प्रकारचे हमी पत्र महिला पुरुष कामगारांकडून भरून घेतले जात असल्याने इमारत व इतर बांधकाम कामगारांची मोठी गर्दी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होत आहे.
हमीपत्र भरताना कामगाराचे कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असल्याचे नमूद करून त्याला वस्तू संच सुस्थितीत प्राप्त झाल्याचे सुद्धा हमी पत्रात लिहून घेतले जात आहे परंतु प्रत्यक्षात त्यांना वस्तू संच दिला जात नाही.
वस्तू संच सुस्थितीत प्राप्त झाल्याचे का लिहून घेतले जात आहे आणि असे हमी पत्रात नमूद केले असले तरी आम्ही पत्र भरून घेतात मग वस्तू संच केव्हा देणार याबाबत कामगारांमध्ये मोठा संशय व्यक्त केला जात आहे.
तसेच आम्ही पत्र भरण्याची प्रक्रिया यावल तालुक्यात प्रत्येक महसूल मंडळात केली तर कामगारांना आपले काम धंदा सोडून यावल येथे न येता आपल्या जवळ मंडळात व्यवस्था झाल्याने त्यांची वेळ आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल त्यासाठी संबंधितांनी तात्काळ महसूल मंडळ स्तरावर कामगारांना वस्तू संच देण्याची तात्काळ कार्यवाही करावी अशी अनेक कामगारांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.