चाळीसगाव पोलीस निरीक्षक कंट्रोल जमा : तर पोलीस कर्मचारी अजय पाटील निलंबीत..

चाळीसगाव – शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाकडून 3 लाखांची खंडणी मागून 1 लाख 20 हजार रुपये उकळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अधीक्षक यांनी कारवाई करत चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची बदली नियंत्रण कक्षात केली असून, संबंधित कर्मचारी अजय पाटील याला देखील निलंबित करण्यात आले आहे.
चाळीसगावमधील एका कंप्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचे मालक स्वप्निल राखुंडे रविवार रोजी पोलीस कर्मचाऱ्याने “निखिल राठोड कोण आहे?” अशी विचारणा करत क्लासमध्ये एक घटना घडली असून, तुझ्यासह तुझ्या कुटुंबीयांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल,” अशी धमकी दिली. त्यानंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी 3 लाख रुपयांची मागणी केली.राखुंडे यांनी सुरुवातीला मित्राकडून ५० हजार रुपये उधार घेऊन दिले आणि नंतर ७० हजार रुपये दिले. त्यानंतर मित्रांच्या सल्ल्याने सोमवार रोजी चाळीसगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्यासमवेत शहर पोलीस ठाण्यात चार तासांचा ठिय्या दिला. याची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची बदली केली तसेच हवालदार अजय पाटील याचे निलंबनही करण्यात आले असून, उकळलेले 1.20 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.