यावल

यावल शहरात यशोदाई फाउंडेशन संचलित वृद्धाश्रमाचे उदघाट्न..

यावल दि.२८ ( सुरेश पाटील ) यावल शहरात यशोदाई फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने काळाची गरज असलेले वृद्धाश्रम सेवा केंद्राचे उदघाट्न केले.या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण यावल परिसरातून कौतुक करण्यात येत असली तरी या संस्थेला तथा सामाजिक उपक्रमाला सर्व स्तरातून सर्व प्रकारे सहकार्य मिळायला पाहिजे अशी समाजात चर्चा आहे.

यशोदाई फाउंडेशन, यावल ही एक सामाजिक,स्वयंसेवी संस्था धर्मदाय आयुक्त यांकडे अधिकृत नोंदणी झालेली असून समाजातील सर्वसाधारण कुटुंबातील युवक एकत्रित येऊन समाजपयोगी कार्य करीत असते.या यशोदाई फाउंडेशन चे कार्यकर्ते यांनी सामाजिक गरज लक्षात घेऊन यावल येथे सोमवार दि.२६ मे २०२५ रोजी वृद्धाश्रमाची सुरुवात केली.सदर वृद्धाश्रमाच्या इमारतीचे उदघाट्न जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक व भालोद येथील प्रगतिशील शेतकरी गणेशदादा नेहते यांनी फीत कापून केले. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून यावल भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोपालसिंग पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. माजी शिक्षण,आरोग्य माजी सभापती रविंद्र सूर्यभान पाटील,भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,यावल कृ.ऊ.बा.स.संचालक विलास पाटील,यावल येथील प्रगतीशील शेतकरी प्रमोद नेमाडे,भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सुनिल पाटील,यावल भाजपा माजी शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र काठोके,नितीन सोनार,भुषण राजेंद्र पाटील,सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीपभैय्या सोनवणे, आमदार अमोलदादा जावळे यांचे जनसंपर्क प्रमुख संदीप पाटील, योगेश साळुंखे,यशोदाई फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज बारी, उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यभान पाटील, राहुल कोळी,विजय सावकारे, अनिता बाविस्कर,गणेश कायस्थ उपस्थित होते.

नितीन सोनार,डॉ.निलेश गडे,रविंद्र सूर्यभान पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषण करतांना वृद्धाश्रम ही अशिक्षित समाजापेक्षा सुशिक्षित समाजाची गरज जास्त असल्याचे मत गोपालसिंग पाटील यांनी व्यक्त केले.सूत्रसंचलन,आभारप्रदर्शन डॉ. सुनिल पाटील यांनी व्यक्त केले. वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्तींची वैद्यकीय विनामूल्य उपचारांसाठी मी केव्हाही २४ तास सेवेत हजर राहील असे आश्वासन त्यांनी दिले. आज सोमवती अमावस्या आहे, छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे कोणतेही मोठे कार्य अमावस्या दिवशी केले,त्याप्रमाणे त्यांचे मावळे असलेले उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज वृद्धाश्रमाची सुरुवात सोमवती अमावस्या दिवशी केली आहे. अध्यक्ष पंकज बारी चहा व्यवसाय करतात,उपाध्यक्ष नरेंद्र पाटील सामाजिक व अध्यात्मिक कार्य करतात,सचिव व इतर कार्यकर्ते पाणीपुरी,कापड व्यवसाय सारखे छोटे व्यवसाय करतात पण यावल सारख्या शहरात वृद्धाश्रमाची गरज लक्षात घेऊन त्यांनी एक महान कार्य केले आहे याबाबत मनोगत डॉ.सुनिल पाटील यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे