वादळी दमदार मान्सूनमुळे लाकूडतोड,विक्रेते,अवैध लाकूड वाहतूक साठवणूक करणाऱ्यांसहसह वनविभागाची चांदी..

यावल दि.१६ ( सुरेश पाटील ) – मान्सूनने दमदार वारा वादळ पावसासह हजेरी लावल्याने यावल तालुक्यात अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष उनमळून पडल्याने झाडाच्या फांद्या तुटल्याने आणि याचे निमित्त सादर अनेक ठिकाणचे जिवंत वृक्षांची झाडे जोडण्याची तोड अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक करून अवैधरित्या विक्री व साठवणूक करणाऱ्यांसह वन विभाग व संबंधित विभागाची मोठी चांदी होत असल्याचे यावल तालुक्यात बोलले जात आहे याकडे कोणाचेही नियंत्रण नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
यावल तालुक्यातील डोंगरकठोरा फाटा ते डोंगरकठोरा गावापर्यंत आणि इतर अनेक ठिकाणी शेती शिवारात,शेत शिवारातील रस्त्याचे आजूबाजूचे आणि शेतातील बांधांवरील असलेली हिरवी मोठमोठी झाडे तोडण्यात येत आहे
गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी वादळासह मुसळधार पाऊस पडला त्यात रस्त्यावर अनेक झाडे व काही झाडांच्या फ़ांद्या तुटून पडल्या होत्या त्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल व वन विभागाच्या हद्दीत असलेला रस्ता डोंगर कठोरा फाटा ते डोंगर कठोरा गाव या रोडवर अवैधरित्या झाडांची कत्तल केली जात असून ही तोड करण्यासाठी कुठलीही परवानगी नाही किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी सुद्धा घेतलेली नाही. यात परिसरामध्ये वन विभागाचे काही ठराविक कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना विचारणा केली असता त्यांना हा प्रकार माहीतच नाही असे त्यांनी सांगितले एवढी मोठी वृक्ष तोड होत असताना वन विभाग,महसूल कर्मचारी डोळेझाक करून गप्प का.? बसले आहे याबाबत सर्व स्तरातील नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात असून शासन व लोकप्रतिनिधी बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे, हिरव्या झाडांची अवैध कत्तल होत असताना सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल व यावल पूर्व – पश्चिम वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे का..? अवैध तोड लाकडाची वाहतूक आणि साठवणूक संबंधित विभागांना आढळून येत नाही का..? ठिकठिकाणी नाक्यावर नाकी कारकून आपल्या मोबाईल मध्ये व्यस्त असतात का..? त्यांना त्यांच्या समोरून जाणारी अवैध लाकडाची वाहतूक का दिसून येत नाही..? अशा प्रकारे जिवंत वृक्षांची झाडांच्या कत्तलीने पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होत असून वेळेवर पाऊस पाणी होत नसून कुठलीही कार्यवाही वनविभाग का करत नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.
होत असलेल्या अवैध वृक्ष तोडी वर तात्काळ कार्यवाही करून झाड तोड करणाऱ्या,जळाऊ लाकडांचे ठिकठिकाणी साठे करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
अवैध तोड झालेल्या सागवानी जप्त वृक्षांचे काय..?
यावल पूर्व पश्चिम वन विभागाच्या कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील अवैध तोड झालेले सागवानी वृक्ष यावल वन विभागाने गेल्या तीन-चार दिवसापासून जप्त केले आहे ही कारवाई प्रसिद्धी माध्यमांपासून संबंधितांनी लपवून ठेवल्याचे सुद्धा यावल तालुक्यात बोलले जात आहे.