यावल येथील सरस्वती विद्या मंदिरात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..
यावल दि.१६ ( सुरेश पाटील ) – यावल येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्ष २०२५- २६ करिता विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी,उपाध्यक्ष श्रीकांत सराफ व संचालकांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक प्रा.एस.एम.जोशी सर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आपल्या शिक्षकांच्या सहकार्याने शाळेची सजावट करून विद्यार्थी ज्यावेळी शाळेत आले त्यावेळी त्यांचे स्वागत केले.विशेषतः व्यास प्रासादिक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्रीकांत सराफ यांनी व मुख्याध्यापकांनी प्रथम दिवशी शिक्षकांचे देखील स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवामध्ये पुष्प देऊन व पुष्पृष्टी करून बँड पथकाच्या साथीने उत्साहवर्धक वातावरणात प्रवेशोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला.शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला.विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देऊन नवीन शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात सूत्रसंचालन डॉ.नरेंद्र महाले तर आभार ज्येष्ठ शिक्षक एन.डी.भारुडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.