किनगाव जवळ हॉटेल मध्ये अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा..
यावल (प्रतिनिधी)- बऱ्हाणपूर अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गावर यावल तालुक्यातील किनगाव जवळ हॉटेल मनमंदिर मध्ये वेश्याव्यवसाय होत असल्याची गुप्त खबर यावल पोलिसांना मिळाल्याने यावल पोलिसांनी अचानक धाड टाकून संबंधितांना रंगेहात पकडून गुन्हा दाखल केल्याने संपूर्ण यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली.
सविस्तर माहिती अशी की,यावल चोपडा महामार्गालगत किनगाव शिवारात असलेल्या मनमंदिर लॉजिंग हॉटेलवर पोलिसांनी अचानक छापा घालून पीडित महिलेची सुटका केली व वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या तिघांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार दिनांक 19 रोजी सायंकाळी घडला याबाबत पोलीस कॉन्स्टेबल यांनी यावल पोलिसात फिर्याद दिली की ३१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात भाडेतत्त्वावर लॉजिंग हॉटेल घेतली होती दि.१९ जून २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजेचे सुमारास पोलिसांनी अचानक छापा घालून गोपाळ निंबा पाटील व २८ राहणार दहिगाव तालुका यावल पराग प्रकाश लोहार वय २४ ज्ञान चेतना अपार्टमेंट खेडी बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव आणि समाधान शालिक तायडे २२ रा.साकळी तालुका यावल यांनी संगनमत करून स्वतःचे फायदे साठी जळगाव शहरातील पीडित महिला हिस वेश्याव्यवसाया करिता त्यांचे लॉजिंग मध्ये वेश्याव्यवसाय करण्याकरिता जळगाव येथून बोलावून सदर लॉज मध्ये जागा उपलब्ध करून दिली होती या जागेवर कुंटनखाना चालविताना ते मिळून आलेत याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिले वरून वरील तिघांविरुद्ध
यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हॉटेलमध्ये मोबाईल रोकड आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे सदरच्या प्रकाराने यावल तालुक्यात एकच खळबळ उडाली असून असे प्रकार बंद करण्यात यावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहेत.