
रावेर – हमीद तडवी – रावेर तालुक्यातील सावखेडा जवळ मुरूम वाहतुक करणाऱ्या ढंपरने एका मोटरसायकल स्वाराला उडवल्याची घटना दिनांक २१ रोजी घडली.त्यात मोटरसायकल स्वाराला गंभीर दुखापत झाली असल्याचे समजते. अपघात ग्रस्त डंपरचा ड्रायव्हर हा दारूच्या नशेत होता.अशी मुरूम वाहतूक बऱ्याच दिवसांपासुन लोहारा, सावखेडा, गौरखेडा, कुंभारखेडा, उटखेडा, खिरोदा, रोझोदा, सावदा परीसरात सुरू असून भरधाव वेगाने ही मुरूमाने भरलेली वाहने चालवतात व यांच्या भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचे परिसरात बरेच छोटे मोठे अपघात घडले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक २१ रोजी ११ वाजेच्या सुमारास सावखेडा गावाजवळ ढंपर क्रमांक एम एच १९झेड ३९९१ या मुरूम भरलेल्या ढंपरने मोटरसायकल क्रमांक एम एच १९ बी डब्ल्यू ७३१७ या मोटरसायकलला धडक दिली व त्यात मोटरसायकल वरील चालक सरफराज हबीब तडवी (वय ५३)हल्ली मुक्काम रावेर रा. कळमोदा यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यात सावदा पोलीस स्टेशन तर्फे ढंपर क्रमांक एम एच १९ झेड ३९९१,एम एच १९ झेड ५३०१, एम् एच १९ सी वाय ०१७३ असे एकूण तीन ढंपरे पोलिसांनी पकडून पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय रावेर येथे पाठवली.तरी महसूल विभागाकडून या तीन ढंपर वर काय कारवाई होणार ?याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.बऱ्याच दिवसांपासून लोहारा ,सावखेडा, खिरोदा, रोझोदा, परिसरामध्ये मुरूम वाहतूक सुरू असून हे मुरूम वाहतूकीची वाहने भरधाव वेगाने चालवत आसता.
लोहारा येथूनअवैध पद्धतीने मुरूम भरून डंपर द्वारे खुलेआम महसूलच्या नाकावर टिचून अवध्य पद्धतीने वाहतूक. परिसरातून महसूल विभाग काय? कारवाई होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे