खुनाच्या गुन्हयातील आरोपीला ८ तासात LCB ने केले जेरबंद..

फत्तेपुर – पोलीस स्टेशन हददीत कसवापिंप्री ते पिंपळगांव चौखांवे रस्त्यावर दि.22 रोजी सकाळी ७.०० वा सुमारास एक पुरुष जातीचे प्रेत मिळुन आल्याची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. सदरचा प्रकार हा घातपाताचा वाटत असल्याने सदर अनोळखी प्रेताची आजुबाजुच्या नागरिकांकडे चौकशी केली असता त्याची ओळख पटल्याने तो कसबा पिंप्री गावातीलच राहणार असल्याची व त्याचे नाव शुभम धनराज सुरळकर असे असल्याचे समजले. घातपाताचा प्रकार असल्याने सदर गावचे पोलीस पाटील यांनी फत्तेपुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यावरुन अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे नेमलेले पथक तसेच फत्तेपुर पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार यांनी घटनाठिकाणी तात्काळ भेट दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा विभाग यांनी नमुद पथकास सुचना दिल्या की, सदरचा घातपाताचा प्रकार हा या ठिकाणी झालेला नसुन सदरचे प्रेत हे वाहेरुन आणुन येथे टाकलेले आहे. त्यावरुन कसवा पिंप्री गावामध्ये तसेच फत्तेपुर गावामध्ये गोपनिय बातमीदार तसेच नागरिकांकडे सखोल चौकशी केली असता, माहिती मिळाली की, काही दिवसापासुन मयत शुभम याचे व त्याचे वडीलांचे घरी नेहमी भांडणे होत होती, शुभम याला दारु पिण्याचे व्यसन असल्याने त्याची पत्नी देखील काही दिवसापासुन त्याचे सोबत राहत नव्हती व माहेरी गेलेली होती. अशी माहिती मिळाल्याने पोलीसांनी मयत शुभम याचे घरी जावुन घराची पाहणी केली असता घराच्या मधल्या खोलीमध्ये जमीनीवर टाकलेली संशईत चटई पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी बाजुला काढली असता जमीनीवर रक्ताचे डाग दिसल्याने लागलीच मयत शुभम याचे वडील धनराज सुपडु सुरळकर यास संशयावरुन पुढील चौकशीकामी ताव्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडेस सखोल चौकशी केली असता त्याने कबुल केले की, मुलगा शुभम हा नेहमी घरी दारु पिऊन येत असे व घरातील आम्हा सर्वांना विनाकारण शिवीगाळ, मारहाण करत असे. त्याच्या या वागण्यामुळे त्याची पत्नी देखील त्याला सोडुन गेलेली होती. त्याचा घरामध्ये खुप त्रास होऊ लागल्याने मी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. व रात्री आम्ही सगळे झोपल्यानंतर मी त्याच्याजवळ जावुन तेथे जवळच असलेला दगड हा त्याच्या डोक्यात घातला व तो जागीच मरण पावला. मात्र मला त्याचा मृतदेह हा तेथुन हलवायचा होता, मला एकटयाला हे शक्य नसल्याने माझा दुसरा मुलगा गौरव धनराज सुरळकर तसेच माझा मोठा भाऊ हिरालाल सुपड्डु सुरळकर यांना झोपेतून उठवुन तेथे बोलावुन घेतले. ते तेथे आल्यावर आम्ही शुभम याचा मृतदेह हा आमच्याच चारचाकी गाडीमध्ये घालुन पिंपळगाव चौखांवे रोडवर नेवुन टाकला व परत घरी आलो. अशी हकिगत संशईत आरोपी धनराज सुरळकर याने पोलीसांना सांगीतल्याने सदरचा गुन्हा हा आरोपी क्र १ धनराज सुपड सुरळकर वय ५२ वर्षे धंदा शेती, रा. कसबा पिंप्री ता. जामनेर याने केला असुन मयत शुभम सुरळकर याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणेकामी आरोपी क्र २ गौरव बनराज सुरळकर वय व आरोपी क्र ३ हरीलाल सुपडु सुरळकर दोघे रा. कसवा पिप्री ता. जामनेर यांनी आरोपी क्र १ यास मदत केली असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचा गुन्हा उघडकिस आणुन आरोपी क्र २ व ३ यांनाही फत्तेपुर गावचे परिसरातुन ताब्यात घेवुन पुढील कार्यवाहिकरीता फत्तेपुर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जळगांव डॉ. महेश्वर रेडडी, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा संदिप पाटील, फत्तेपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकों/विनोद पाटील, पोहेकॉ/लक्ष्मण पाटील, पोना/राहुल पाटील, पोना/हेमंत पाटील, पोकॉ/जितेंद्र पाटील, पोकों/ईश्वर पाटील, पोकों/राहुल महाजन, पोकों/भुषण पाटील, चापोहेको भरत पाटील, दर्शन ढाकणे तसेच फत्तेपुर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी केली असुन पुढील तपास फत्तेपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अंकुश जाधव हे करीत आहेत.