शिरसोलीत मिठाईच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची धाड : 151 किलोचा साठा जप्त..

जळगाव – जिल्ह्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी शिरसोली प्र.न., जळगाव येथील मे. चौधरी स्वीट्स अँड नमकीन या ठिकाणी धाड टाकण्यात आली.

सदर ठिकाणी पेढा, बुंदी लाडू, म्हैसूर पाक, गोड गावा आदी मिठाईचे उत्पादन कमी दर्जाचे व अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या नियमांना अपुरे असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित १५१ किलोग्रॅम मिठाईचा एकूण रुपये २४,१३०/- किमतीचा साठा जप्त करून नाशवंत असल्याने नष्ट करण्यात आला.
जिल्ह्यातील अस्वच्छ वातावरणात तयार होणाऱ्या मिठाई व इतर अन्न पदार्थांच्या विक्रीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) संतोष कृ. कांबळे यांनी दिली आहे.सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, जळगाव संतोष कृ. कांबळे यांच्या पथकाने केली.
जळगाव शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिठाई विक्री व निर्माते असून जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासना तर्फे कसून तपासणी होऊन कडक कारवाई होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या
पारोळा जवळ बस व टेम्पोचा भीषण अपघात एक ठार अनेक जखमी..
एरंडोल मध्ये शेतात शॉक लागून 5 जणांचा जागीच मृत्यू..
10 हजाराची लाच : शिक्षण विस्तार अधिकारी धुळे ACB च्या जाळ्यात..