जळगाव

भुसावळ मध्ये 10 किलो गांजा जप्त : LCB व बाजारपेठ पोलीसांची संयुक्त कारवाई..

भुसावळ – दि. २२ रोजी पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ. गोपाळ गव्हाळे यांना गुप्त माहिती मिळाली की, भुसावळ शहरात काळ्या रंगाच्या होन्डा शाईन मोटारसायकलवरून अवैध गांज्याची वाहतूक केली जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले. दरम्यान, ही माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यालाही देण्यात आली. त्यानंतर हॉटेल सुरुची इन समोरील राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर संयुक्त पथकाने सापळा रचला.यावेळी, नमूद वर्णनाप्रमाणे काळ्या रंगाच्या सी.बी. होंडा शाईन मोटारसायकलवरून एक इसम येताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पसार होण्याचा प्रयत्न करीत होता; मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अनारसिंग वालसिंग भिलाला (वय ३०, रा. शमलकोट, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) असे सांगितले.

तपासात त्याच्या ताब्यातून २ लाख ५ हजार ५०० रुपये किमतीचा एकूण १०.२७५ किलो गांजा, ७५ हजार रुपये किमतीची सी. बी. होंडा शाईन मोटारसायकल (क्र. MP-09-VM-4395) तसेच १० हजार रुपयांचा मोबाईल हॅन्डसेट असा मिळून एकूण २ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पो.ना. विकास सातदिवे यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एन डी पी एस ऍक्ट 1985 कलम 20 (ब), 22 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक,) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक,  सहा. पो. निरी. नितीन पाटील भुसावळ बाजारपेठ पो.स्टे., पो.उप. निरी. शरद बागल, श्रे.पो.उप.निरी.रयो नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाळ गव्हाळे, संदिप चव्हाण, उमाकांत पाटील, पो.ना.विकास सातदिवे, पो. कॉ. प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, चा.पो.कॉ. महेश सोमवंशी सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव, पो. कॉ. हर्षल महाजन, पो.कॉ.परेश बिन्हाडे सर्व नेम. भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. यांच्या पथकाने केली आहे

ईतर महत्वाच्या बातम्या 

एरंडोल जवळ भीषण अपघात भरधाव ट्रॅकने घेतला एकाचा बळी..

शिरसोलीत मिठाईच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची धाड : 151 किलोचा साठा जप्त..

पारोळा जवळ बस व टेम्पोचा भीषण अपघात एक ठार अनेक जखमी..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे