बांभोरी पुला जवळ नदी पात्रात वाळू माफियांचा धुमाकूळ : भरदिवसा सर्रास वाळू चोरी..

जळगाव – जिल्ह्यातील गिरणा वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.गिरणा नदीतून भर दिवसा वाळू वाहतूक सुरू आहे. वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाळू उचल करताना भर दिवसा दिसत आहे. यांच्यावर कारवाई का होत नाही हाच मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
जळगाव जिल्हात वाळूची मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याचे आजूबाजूच्या परिसरामध्ये मागणी आहे त्यामुळे या वाळूचे व्यवसायात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची विक्री होत आहे.
पालकमंत्री यांच्या पाळधी या गावाला जाण्यासाठी व जळगाव शहराला जोडण्यासाठी एक महत्त्वाचा बांभोरीचा पूल आहे हा पूल गिरणा नदीवर बांधण्यात आला असून सदरच्या पुलाच्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाळूचा उपसा भर दिवसाही सुरू आहे नियमानुसार रहदारीच्या पुलाजवळून 200 मीटरच्या नंतर त्या जवळपास वाळू उपसा करू नये मात्र बांभोरी पुलाजवळ सर्व नियम धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणात पुलाजवळून वाळू उपसा करण्यात येतो.
भर दिवसाही वाळू उपसा करूनही कोणीही त्यावर कारवाई का करत नाही हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार गौण खनिज अधिकारी हे कारवाई करण्यासाठी का धजत नाहीये की भर दिवसा बांभोरी पुलाजवळ वाळूची वाहतूक व चोरट्या वाळूची वाहतूक होत आहे मात्र त्यावर कोणतीही कारवाई का होत नाही हे प्रश्न उपस्थित होत आहेत
इतर महत्वाच्या बातम्या
वाळू वाहतुकीसाठी 73 हजाराची लाच : तलाठ्या सह कोतवाल व पंटर ACB च्या जाळ्यात..
अनुदानित आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी मनसेचा तीव्र संताप..