बकऱ्या चोरांच्या चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी आवळल्या मुसक्या..
चाळीसगाव – ग्रामीण पोलीस स्टेशनला दि. 19/05/2025 रोजी रात्री 01.00 वाजेच्या सुमारास फिर्यादी नारायण बाळासाहेब तिकांडे वय 46 वर्षे, धंदा- शेती, रा. शिंदी, ता. चाळीसगाव यांची खराडी, ता. चाळीसगाव शिवारातील शेत गट नं. 23/3/ड/अ मधील राहते घराबाहेर बांधलेल्या बकऱ्या ह्या तीन अनोळखी चोरटे चोरुन घेत जात असतांना फिर्यादी यांना बकऱ्यांचा आवाज आला त्यामुळे फिर्यादी हे झोपेतून उठले व त्या अनोळखी आरोपीतांचा पाठलाग करत असतांना हिरापुर, ता. चाळीसगाव पकडले असता तीन्ही अनोळखी आरोपी हे त्यांचे ताब्यातील बकऱ्यांनी भरलेली ग्रे कलरची युंडाई सेंट्रो गाडी क्र. MH01NA558 हि गाडी जागीच सोडुन पळुन गेले. सदरच्या चारचाकी गाडीमध्ये एकुण 08 बकऱ्या मिळुन आल्या त्यामध्ये फिर्यादी यांच्या तीन बकऱ्या व इतर सुद्धा बकऱ्या होत्या. त्याबाबत फिर्यादी तिकांडे वय- 46 वर्षे, धंदा शेती, रा. शिंदी, ता. चाळीसगाव यांची खराडी, ता. चाळीसगाव यांनी दिलेल्या फिर्यादी फिर्यादवरुन वरप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पो.उपनिरी. कुणाल चव्हाण, पो.उनिरी. राहुल राजपुत, सहा.पो.उपनिरी. युवराज नाईक, पो.हे.कॉ. रविंद्र रावते, पो.हे.कॉ. प्रविण संगेले, पो.हे.कॉ. नितीन सोनवणे, पो.हे.कॉ.संदीप पाटील, पो.हे.कॉ. अकरम बेग, पो.ना. भगवान माळी, पो.कॉ. सुनिल पाटील, पो.कॉ. प्रदीप पवार अशांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपी निष्पन्न करुन 1) शांतराम उर्फ जिभ्या सुकलाल गायकवाड वय-29 वर्षे, रा. पिंपरखेड, ता. भडगाव, 2) अमोल महादु मालचे वय 22 वर्षे, रा. यशवंत नगर, भडगाव, 3) सुनिल बापु देवरे (भील) वय 23 वर्षे, रा. लोणी सीम, ता. पारोळा अशांचा शोध घेवुन त्यांना वरील गुन्ह्याकामी अटक केली सदर संशयिती आरोपीनी चाळीसगाव तालुका व जवळपासच्या परिसरात तसेच जळगाव, धुळे, मालेगाव, नंदुरबार, संभाजीनगर ग्रामीण परिसरात सुद्धा अशाच प्रकारे बकऱ्या चोरीसारखे बरेच गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. त्याबाबत पोलीस निरीक्षक सो. यांचे आदेशाने पुढील सखोल तपास पो.ना. भगवान माळी हे करीत आहेत.