जळगाव

शनिपेठ पोलीस स्टेशनचा लाचखोर पोलीस नाईक थेट बडतर्फ : पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली..

जळगाव : शनिपेठ पोलीस ठाण्यात सलग घडलेल्या गंभीर घटनांमुळे पोलीस प्रशासनाने अखेर कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेल्या पोलीस नाईक विनोद अहिरे याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मागील काही दिवसांत शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर अवघ्या काही दिवसांतच पोलीस नाईक विनोद अहिरे याला १ लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने कारवाईचा बडगा उगारत संबंधितांवर कठोर कारवाई केली. लाचखोर कर्मचाऱ्याला थेट बडतर्फ करण्यात आले, तर ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बदली करत कडक कारवाई केली.शनिपेठ पोलीस ठाण्याचा तात्पुरता कार्यभार आता सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची गुन्हे आढावा बैठक घेत संवेदनशील घटनांवर नाराजी व्यक्त केली. अनेक अधिकाऱ्यांची कडक कानउघाडणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

१ लाखाची लाच : शनिपेठ पोलीस स्टेशनचा पोलीस नाईक ACB च्या जाळ्यात..

 “केवायसी साठी १०० रुपयांची लाच : गृह उपयोगी संच वाटप केंद्रावरील महिला कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल! ACB ची कारवाई 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे