जळगाव

“जळगाव पोलीस अधीक्षकांची पोलीस अंमलदाराच्या घरी अचानक भेट..

पोलीस अधीक्षकांनी अंमलदारांच्या कुटूंबा कडून जाणून घेतल्या समस्या..

जळगाव : कर्तव्य बजावताना पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करत जळगावचे पोलीस अधीक्षक यांनी सायंकाळी एका पोलिस अमलदाराच्या घरी अचानक भेट दिली.या भेटीदरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना त्यांच्या घरातील अडचणी प्रत्यक्ष पाहण्यात आल्या. घरामध्ये अपुरी सोय, प्लास्टरिंगचे अपूर्ण काम तसेच घराबाहेर पूर्ण अंधार असल्याची समस्या कुटुंबातील सदस्यांनी साहेबांसमोर मांडली.

ही बाब गांभीर्याने घेत पोलीस अधीक्षकांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधून संबंधित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार प्लास्टरिंग व लाईटची व्यवस्था तातडीने करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

या अनपेक्षित भेटीमुळे पोलिस अमलदाराच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलीस अधीक्षकांच्या या संवेदनशील व तत्पर भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करणारा अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे