गुन्हेगारीजामनेर

IPL क्रिकेट सट्ट्यावर एलसीबीची धाड : 10.53 लाखांचा मुद्देमाल जप्त..

जामनेर : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत तब्बल 10 लाख 53 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जामनेर पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरखेडा रोड परिसरातील एका घरावर करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही इसम आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम व इतर साहित्य आढळून आले.

जप्त मुद्देमाल

9 लाख 2 हजार 300 रुपये रोख रक्कम

1 लाख 30 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन

25 हजार रुपये किमतीचा टीव्ही व साऊंड बार

41 एटीएम कार्ड

इतर साहित्य

एकूण 10 लाख 53 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.देवानंद सुभाष सोनवणे (रा. जामनेर),रितेश अशोक नेरकर (रा. जामनेर),परीक्षित रविंद्र पाटील (रा. जामनेर),प्रवीण जगन्नाथ टहाकडे (रा. जामनेर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 236/26 अन्वये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4 व 5 प्रमाणे चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ईतर महत्वाच्या बातम्या 

5 लाखाची लाच : सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता ACB च्या जाळ्यात..

जळगाव जिल्ह्यात पोलिसांची नाकाबंदी मोहीम : ३९९ वाहनचालकांवर कारवाई..

जळगावकरांच्या सुरक्षिततेसाठी उपमहापौरांनी घेतली  आरोग्य विभागाची तातडीची आढावा बैठक..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे