ब्रेकिंग

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात विकासाची आणि गरुडझेप..

जळगाव : धरणगाव तालुक्याच्या मातीतील एक सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व… हा प्रवास थक्क करणारा आहे. ‘विकासाचा ध्यास’ मनी बाळगून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी आपल्या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लावले आहे.जलसमृद्धीपासून ते आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांपर्यंत त्यांनी राबवलेली आज जळगावच्या विकासाचा मुख्य कणा बनली आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या याच झंझावाती आणि सकारात्मक कार्याचा घेतलेला हा विशेष आढावा : गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री म्हणून केवळ राज्यालाच दिशा दिली नाही, तर स्वतःच्या जिल्ह्यात ‘जलसंकल्प’ अभियानांतर्गत २१० किमी नदीचे खोलीकरण करून दाखवले. यामुळे धरणगाव व जळगाव तालुक्यात सिंचन क्षमतेत मोठी वाढणार असून, शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्याला अद्ययावत जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. तसेच, ५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेले अत्याधुनिक जिल्हा ग्रंथालय भवन जिल्ह्यातील तरुणांच्या शिक्षणाला आणि प्रगतीला नवी दिशा ठरत आहे.मतदारसंघातील आणि ग्रामीण भागातील रस्ते व पूल बांधणीसाठी तब्बल ३३० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटी वाढवून मदत होणार आहे. केवळ पायाभूत सुविधाच नव्हे तर हजारो गरीब नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे आयोजन, गरजू मुलींना सायकलींचे वाटप आणि शालेय साहित्याचे वाटप करून त्यांनी समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी नेहमीच चोख पार पाडली आहे

जळगावला ‘D+’ झोनचा दर्जा मिळवून देऊन जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना मोठी चालना दिली, ज्यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. ७ कोटींच्या निधीतून नशिराबाद येथील भव्य आणि प्रशस्त पाणीपुरवठा योजना साकारली, ज्याने हजारो नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवली.

५० कोटींच्या निधीतून उपजिल्हा रुग्णालयाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होणार आहे.सुरक्षा आणि आधुनिकता: पाळधी पोलीस स्टेशनचे भव्य नूतनीकरण करून पोलीस दलाला आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.वन्यप्राणी उपचार केंद्र: लांडोर खोरी वनक्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी विशेष उपचार केंद्राची उभारणी करून पर्यावरण आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी मोठे पाऊल उचलले आहे.

गुलाबराव पाटील यांच्या कामाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांचा जनसंपर्क. जनतेच्या सुख-दुःखात थेट धावून जाणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. शेतकऱ्यांचे हित केंद्रबिंदू मानून त्यांनी प्रत्येक कृषी योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे केली आहे. त्यांच्या याच अफाट कर्तृत्वामुळे आज संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून आणि शिवसेनेच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जळगाव जिल्ह्याला विकासाच्या शिखरावर नेणाऱ्या या जननेत्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे