पारोळा

देवगाव येथील मूक-बधिर निवासी विद्यालयात शैक्षणिक साहित्य व अल्पोपहाराचे वाटप..

देवगाव, ता. पारोळा (प्रतिनिधी) : कालिका देवी अपंग शिक्षण संस्था, देवगाव संचलित कै. नानासो खंडेराव पाटील मूक-बधिर निवासी विद्यालयात बुधवार (दि. ८ जुलै २०२६) रोजी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप व अल्पोपहार वितरणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकारी अध्यक्ष श्री. राहुल साहेबराव पाटील हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचेही वितरण करण्यात आले. यावेळी देवगाव येथील ज्येष्ठ भजनी मंडळाचे ह.भ.प. दादासो भिकन रामकृष्ण पाटील, ह.भ.प. दिलीप ठाकरे, ह.भ.प. तुकाराम आप्पा, ह.भ.प. भाईदास महाराज, ह.भ.प. रविंद्र पाटील, ह.भ.प. रमेश अण्णा आणि ह.भ.प. संभाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शशिकांत खंडेराव निकम, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, उत्तम संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि जीवनात आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे