चाळीसगाव

जळगाव जिल्ह्यात लाखो बोगस बांधकाम कामगार नोंदणीचा आरोप करत कल्पेश विजय महाले यांची चौकशीची मागणी..

चाळीसगाव : जळगाव जिल्ह्यासह चाळीसगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर बोगस बांधकाम कामगार नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप करत संपादक तथा व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश विजय महाले यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर व राज्यमंत्री आशिष जैसवाल यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, प्रत्यक्षात बांधकाम क्षेत्रात कार्यरत नसलेल्या व्यक्तींचीही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यात आली असून, या प्रक्रियेत आवश्यक पडताळणी करण्यात आलेली नाही. बांधकाम कामगार नोंदणीसाठी आवश्यक असलेले ९० दिवसांच्या कामाचा अनुभव दर्शविणारे दाखले मोठ्या प्रमाणावर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच काही ठेकेदारांकडून मोठ्या संख्येने कामगारांना अनुभव प्रमाणपत्रांवर सही व शिक्के दिले गेले असून त्या ठेकेदारांच्या प्रत्यक्षात कोणत्या ठिकाणी त्यांचे बांधकाम चालू आहे, संबंधित कामगार प्रत्यक्षात त्या ठेकेदारांकडे काम करत होते का, एवढे कामगार त्या ठेकेदाराकडे काम करत होते मग त्या ठेकेदाराने त्याच्या चालू असलेला बांधकाम कामाचा कर शासनाला भरला आहे का, शिक्के देणाऱ्या ठेकेदारांकडे एवढे कामगार कामाला होते मग त्यांनी प्रत्यक्षात कोणत्या ठिकाणी बांधकाम केलेल्या कामांची पाहणी करावी याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

यासंदर्भात संबंधित विभागीय अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे अनेक वेळा तोंडी तक्रारी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, त्याची दखल घेण्यात आली नसल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे.

या प्रकरणात संपूर्ण चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करावी, शासनाची फसवणूक झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत तसेच गैरप्रकारात सहभागी ठेकेदारांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी तक्रारदार कल्पेश महाले यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे