ब्रेकिंग

जळगाव शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे उपमहापौरांचे आदेश..

जळगाव : शहराचे वैभव आणि महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या मेहरूण तलावात शहरातील गटारीचे सांडपाणी जाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी आता तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी दिले आहेत.

मेहरूण तलावाच्या प्रदूषणाच्या प्रश्नावर आज उपमहापौर मनोज सुरेश चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेवक नितीनभाऊ सपके, नगरसेविका वैशालीताई पाटील, नगरसेवक अमरकाका जैन आणि नगरसेवक डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी तलावात जाणारे सांडपाणी कायमस्वरूपी रोखण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

तलावात तब्बल १६ ड्रेनेजचे सांडपाणी

मेहरूण तलावात एक-दोन नव्हे तर तब्बल १६ ड्रेनेजमधून सांडपाणी सोडले जात असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.याशिवाय गणेश विसर्जनापूर्वी तलाव परिसरातील दोन पंप हाऊस तातडीने सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले. सांडपाण्याचा प्रवाह तलावाकडे जाणार नाही, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यावरही भर देण्यात आला.

ठेकेदाराकडून ब्ल्यू प्रिंट सादर

बैठकीदरम्यान संबंधित ठेकेदाराने सांडपाणी तलावात जाण्यापासून रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची ब्ल्यू प्रिंट सादर केली. सांडपाण्याचा प्रवाह अडविणे, आवश्यक ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभारणे आणि तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन याबाबत माहिती देण्यात आली. मेहरूण तलाव हा जळगाव शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जलस्रोत आहे. त्यामुळे तलावात गटारीचे पाणी जाणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, अशी कठोर भूमिका उपमहापौरांसह उपस्थित पदाधिकारी व नगरसेवकांनी व्यक्त केली.

कागदोपत्री नव्हे, प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे

तलावात सांडपाणी जाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने विलंब न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे स्पष्ट आदेश उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी दिले. तसेच कामाची गुणवत्ता, नियोजनानुसार अंमलबजावणी आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण होते की नाही, यावर महापालिका प्रशासनाने काटेकोर लक्ष ठेवावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.

“मेहरूण तलावाचे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे कागदोपत्री उपाययोजना न करता प्रत्यक्षात परिणाम दिसला पाहिजे. गटारीचे पाणी तलावात जाणार नाही, यासाठी ठोस व्यवस्था तातडीने झाली पाहिजे. याबाबत आयुक्त साहेबांशीही चर्चा करण्यात येईल,” असे उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी सांगितले. मेहरूण तलावाचे प्रदूषण रोखून तलाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे