रावेर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेरमध्ये पोलिसांचा रूट मार्च..

१३ अधिकारी, २४० पोलीस अंमलदार आणि १६० होमगार्डचा सहभाग; नागरिकांना शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन

रावेर, : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेचे वातावरण कायम राहावे, तसेच नागरिकांमध्ये पोलिसांबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी जळगाव पोलीस प्रशासनाच्या वतीने बुधवारी सकाळी भव्य रूट मार्च काढण्यात आला. सकाळी १०.४५ वाजता सुरू झालेला हा रूट मार्च दुपारी १२ वाजता शांततेत समाप्त झाला.

जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, फैजपूरचे उपविभागीय दंडाधिकारी बबनराव काकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च पार पडला. रूट मार्चमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह विविध पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. याशिवाय जळगाव स्थानिक गुन्हे शाखा, यावल, सावदा, निंभोरा, मुक्ताईनगर आदी पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी तसेच SRPF, दंगल नियंत्रण पथक, स्ट्रायकिंग फोर्स, BDDS आणि रेल्वे पोलिसांचा सहभाग होता.

१३ अधिकारी, २४० पोलीस आणि १६० होमगार्ड

रूट मार्चसाठी रावेर पोलीस ठाणे, LCB, यावल, सावदा, निंभोरा आणि मुक्ताईनगर येथील पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. अमरावती SRPFचे २४ जवान, विविध RCP पथकांचे ४८ जवान, भुसावळ व फैजपूर डिव्हिजनचे स्ट्रायकिंग फोर्स तसेच BDDS आणि GRP पथकांचा बंदोबस्तात समावेश होता.

एकूण १३ पोलीस अधिकारी, २४० पोलीस अंमलदार आणि १६० होमगार्ड जवान या रूट मार्चमध्ये सहभागी झाले.

रूट मार्चदरम्यान पोलिसांनी रावेर शहरातील प्रमुख विसर्जन मार्ग, महत्त्वाचे चौक आणि संवेदनशील भागातून संचलन केले. मोठ्या संख्येने पोलीस दल रस्त्यावर उतरल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रशासनाची सज्जता अधोरेखित झाली.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

आगामी गणेशोत्सव नागरिकांनी उत्साहात, शांततेत, शिस्तीत आणि सामाजिक सलोखा राखत साजरा करावा. कोणत्याही अफवा किंवा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव पोलीस प्रशासनाने केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे