जळगाव जिल्हा

कोळन्हावी चेकपोस्ट वर विनापरवाना लाकूड वाहतूक करणारे वाहन जप्त : ३ लाख १० हजारांचा मुद्देमालताब्यात…

यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कोळन्हावी वन तपासणी नाक्यावर वन विभागाने कारवाई करत विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा टाटा ७०९ ट्रक जप्त केला. या कारवाईत वाहनासह सुमारे ३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

वन विभागाच्या  माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी कोळन्हावी वन तपासणी नाक्यावर वन अधिकारी व कर्मचारी वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी टाटा ७०९ ट्रक क्रमांक एमएच ०३ एन ५३०५ हे वाहन तपासणीसाठी थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना लाकूड वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

वाहनातील सुमारे ५ घनमीटर जळाऊ लाकूड, अंदाजे १० हजार रुपये किमतीचे, तसेच ३ लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला. जप्त मुद्देमाल पावतीद्वारे यावल येथील संबंधित वन विभागाच्या केंद्रात जमा करण्यात आला.या प्रकरणी वन गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास टी. वाय. देवरे, वनपाल, वाघझिरा करीत आहेत.

ही कारवाई उपवनसंरक्षक सौरिष सहाय, यावल वनविभाग, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे