जळगाव

चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शेत पाणंद रस्ते र्निमिती बाबत तहसीलदारांना निवेदन..

यावल, (प्रतिनिधी ) : चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतात जाण्या- येण्यासाठी तसेच शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले शेत पाणंद रस्ते अनेक ठिकाणी अत्यंत खराब झाले असून काही ठिकाणी रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा. भैय्यासाहेब ॲड संदीप सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शेत पाणंद रस्त्यांची तातडीने निर्मिती, दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत मा. तहसीलदार, तहसील कार्यालय चोपडा यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील सर्व गावांमधील शेत पाणंद रस्त्यांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन पाणंद रस्ते तयार करावेत, अस्तित्वातील रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण करावे तसेच पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे नियमानुसार तातडीने हटवावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

पावसाळ्यात पाणंद रस्त्यांची अवस्था आणखी बिकट होते. चिखल, पाणी साचणे आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे ट्रॅक्टर, बैलगाडी तसेच इतर शेती वाहने शेतापर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाढत असून शेतीची मशागत, पिकांची देखभाल आणि शेतीमालाची वाहतूक यावरही विपरीत परिणाम होत आहे.

पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे नियमानुसार हटवावीत.शेतीमालाची वाहतूक सुलभ होण्यासाठी रस्त्यांची रुंदी व दर्जा नियमानुसार ठेवावा.आवश्यक ठिकाणी मुरूम, खडी टाकून पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावी.उपलब्ध शासकीय योजनांमधून पाणंद रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून कामे तातडीने सुरू करावीत.

प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्राधान्यक्रम निश्चित करून पाणंद रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करावीत.शेत पाणंद रस्ते हे शेतकऱ्यांच्या शेतीच्या दैनंदिन कामकाजासाठी अत्यावश्यक असून, त्यांच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे