जळगाव जिल्हा

दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकविल्याची संतापजनक घटना : दोघांना अटक, तिसरा संशयित फरार..

यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील दहिगाव येथे ५० वर्षीय दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण केल्याचा आणि या घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करून प्रसारित केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी यावल पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, तिसरा संशयित फरार आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी दहिगाव येथील नामदेव  पाटील (५०) यांनी यावल पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान दहिगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर नावरा रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीजवळ ही घटना घडली.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, नितीन उर्फ मुन्ना सुनील पाटील (२३) आणि पंकज उर्फ झग्या संतोष पाटील (२२), दोघेही रा. दहिगाव, यांनी नामदेव पाटील यांचे दोन्ही पाय पकडून त्यांना सुमारे १५ मिनिटे विहिरीत उलटे लटकवले. त्यानंतर त्यांचे कपडे काढून त्यांना मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी साथीदाराने मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. संबंधित व्यक्ती दिव्यांग असल्याची माहिती संशयितांना असतानाही त्यांची टिंगल करण्याच्या व घाबरविण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर प्रसारित करून बदनामी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.विहिरीत उलटे लटकविल्यामुळे पाय निसटून संबंधित व्यक्ती विहिरीत पडण्याची व गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दोघांना अटक; तिसऱ्याचा शोध

नामदेव पाटील यांच्या तक्रारीवरून यावल पोलिसांनी नितीन पाटील आणि पंकज पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू असून, त्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे करीत आहेत. पोलिस तपासानंतर घटनेतील अन्य बाबी स्पष्ट होणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे