चाळीसगाव

चाळीसगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार व चौक सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न…

धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाने भव्य सभागृह उभारण्यासाठी १ कोटी निधी देणार..! – आमदार मंगेशदादा चव्हाण

तुम्ही दिलेली काठी अन्यायाविरुद्ध वापरेल आणि खांद्यावर दिलेली घोंगडी जबाबदारीची जाणीव देत राहील- आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे प्रतिपादन

चाळीसगाव – पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य मोठे आहे, त्या केवळ धनगर समाजाच्याच नाही तर सर्व भारतीयांच्या राजमाता आहेत. ज्या राजमातेने भारतातील काशी विश्वनाथ, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, आदी शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला, नदी वर घाट बांधले, आपल्या धार्मिक अस्मितांचे रक्षण केले त्यांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करता आला हे मी माझे भाग्य समजतो. मागील वर्षी याच ठिकाणी झालेल्या सभेत मी सदर चौकाचे सुशोभीकरण करण्याचा शब्द समाज बांधवांना दिला होता. वर्षभरातच आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या अवघ्या दोन दिवस पूर्वीच माझ्या आमदार स्थानिक विकास निधीतून १५ लक्ष रुपये खर्च करून या देखण्या अश्या स्मारकाचा जीर्णोद्धार होत आहे याचा मला आनंद आहे. यासोबतच चाळीसगाव तालुक्यात ठिकठिकाणी धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाने भव्य सभागृह उभारण्यासाठी १ कोटी निधी देण्याची घोषणा चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केली. ते चाळीसगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथील स्मारक जीर्णोद्धार व चौक सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलत होते.यावेळी भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य तथा धनगर समाज सेवा संस्था प्रदेशाध्यक्ष श्री.नवनाथजी ढगे, धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष साहेबराव भिकनराव आगोणे, घोडेगाव येथील ह.भ.प.शिवाजी हाडपे, उज्वल मोटर्सचे संचालक राजेंद्र रावते, सर्वोदयचे संचालक धर्मा काळे, प्रीतमकाका रावलानी, वसंतराव चंदात्रे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, लातूर येथील रामदास माने, मार्केट सभापती कपिल पाटील, राजेंद्र चौधरी, पैलवान अण्णा कोळी, सतीश पाटे, प्रशांत पालवे, रविंद्र पाटील, आबासाहेब बछे, आबासाहेब रावते, शैलेंद्र पाटील, निलेश महाराज, पप्पूशेठ वाणी, सदानंद चौधरी, धर्मा बछे, शांताराम हाडपे, रमेश सोनवणे, रणजीत देशमुख, विजयाताई पवार, राजेंद्र साबळे, राजेंद्र गवळी, देविदास आगोणे, अॅड.खंडू कोर, अॅड.बोराडे, आबा बोराडे, गणेश जाणे, बापू लेणेकर, घुगे सर, मारुती काळे, प्रदीप देवरे, सागर आगोणे, ज्ञानेश्वर आगोणे, धीरज पवार, विजय वेळे, सागर झोडगे, पोपट आगोणे, दिनेश साबळे, शुभम आगोणे, विशाल धनगर, खंडू जाणे, आबा जाणे, सोनू पेहलवान आद यांच्यासह धनगर समाजाचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर लोकार्पण सोहळा प्रसंगी धनगर समाजाच्या वतीने आमदार मंगेशदादा धनगरी फेटा बांधून, तसेच काठी व धनगरी घोंगडे देऊन सत्कार करण्यात आला. तुम्ही दिलेली काठी ही समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात वापरेल आणि खांद्यावर दिलेली घोंगडी ही समाजाच्या जबाबदारीची जाणीव करून देत राहील. रेखा धनगर सारखी आंतरराष्ट्रीय खेळाडू केवळ धनगर समाजाचाच नव्हे तर चाळीसगावचा गौरव आहे. तीचे पालकत्व घेत विदेशात पाठवता आले ते केवळ तालुकावासियानी मला आमदारकीची जबाबदारी दिली म्हणून. आता धनगर समाजाने देखील आपल्यासाठी काम करणारे कोण आणि वापर करून घेणारे कोण याचा विचार करावा, पुढील काळात समाजाच्या शाश्वत विकासासाठी अजून प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सत्काराला उत्तर देताना केले.प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले नवनाथजी ढगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, धनगर समाजाला आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिलेला शब्द पाळला त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तितके कमी आहेत, जीर्ण अवस्थेत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे नेत्रदीपक असे सुशोभिकरण झाल्यामुळे परिसराची देखील शोभा वाढली आहे. धनगर समाजाने आमदारांच्या कामाची दखल घेत त्यांना साथ द्यावी तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून धनगर समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व द्यावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

प्रास्ताविक पर मनोगतात अॅड. कैलास आगोणे यांनी कार्यक्रमामागची भूमिका मांडली व समाजाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. वाघळी येथील धनगर समाजाची बेसबॉल खेळाडू कु.रेखा धनगर हिच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी जो आर्थिक भार उचलला व तिचे स्वप्न पूर्ण केले त्याबद्दल देखील त्यांनी आभार मानले. सूत्रसंचालक अमोल नानकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनगर समाज पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे