यावल

यावल येथे मोहनमाला नाझीरकर तहसीलदार पदी रुजू

यावल – येथील तहसीलदार महेश पवार यांची बदली नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील तहसीलदार पदी झाल्याने त्यांचे जागेवर , पुणे विभागातून बदलून आलेल्या मोहनमाला नाझीरकर यांनी सोमवारी , येथील तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला . पदभार स्वीकारण्यासाठी भुसावळ मार्गे यावल येथे येत असताना तालुक्यातील अंजाने गावाजवळ अनाधिकृत उगवून खनिज वाहन आढळून आले असता त्या वाहनावर नाझीरकर यांनी कारवाई केली

तहसीलदार मोहनमाला नाझीरकर पुणे येथे नायब तहसीलदार पदावर कार्यरत होत्या . सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार पदी रुजू झाल्यानंतर भुसावळ मार्गे यावल येथे तहसील कार्यालयात येत असताना अंजाळा येथे त्यांना अनाधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे डंपर नजरेस पडले असता येथे येथे विभागातून मोहन माला नाझीरकर यांनी वाहन थांबवत कागदपत्रांची पाहणी केली असता अनधिकृत गौण खनिज वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. यापुढेही अवैध गौण खनिज वाहतुकीवर कडक कारवाई करणार असल्याची त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले या कारवाईने अवैध वाहतूकदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. सोमवारी तहसीलदार नाझरकर यांनी कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेत सूचना दिल्या

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे