यावल

तरुणाचा खुन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी निळे निशाण संघटनेची मागणी

यावल ( प्रतिनिधी )- डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची मिरवणुक काढणाऱ्या तरूणावर समाजकंटकांनी हल्ला करून हत्या केली असुन या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निळे निशाण या सामाजीक संघटनेच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

या संदर्भात निळे निशाण सामाजीक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे व तालुका अध्यक्ष विलास तायडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यात असलेल्या बोंढार या गावात राहणारा अक्षय भालेराव या तरूणाने गावात प्रथमच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची १४ एप्रील रोजी भव्य अशी मिरवणुक काढली या गावातील १५ ते २० जातीयवादी समाजकंटकांनी १ जुन२०२३ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास अक्षय भालेराव या निष्पाप तरूणास बेदम मारहाण करत धारदार चाकुने वार करून हत्या केली. या सर्व गुंडांना भादवी कलम३०२ अनुसार फाशीची शिक्षा देण्यात यावी तसे न झाल्यास निळे निशाण सामाजीक संघटनाच्या माध्यमातुन तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे . निवेदनावर अशोक तायडे , विलास तायडे , लक्ष्मीताई मेढे, सतिष अडकमोल, अनिल इंधाटे , अमोल तायडे , मिलींद सोनवणे , मांगीलाल भिलाला, हिरालाल बारेला , अनारसिंग भिलाला , नान्या बारेला, सायमक बारेला आदींच्या स्वाक्षरी आहेत .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे