यावल

गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

यावल : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने माजी न. से. विजय गजरे यांच्या वतीने ७ जुलै रोजी येथील शेतकी संघाच्या आवारात इयत्ता ५ वी ते ११ वी पर्यंतच्या गरजु विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणेवश वाटपाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.कुंदन फेगडे होते

कार्यक्रमात शहरातील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सरस्वती विद्या मंदिर, शशिकांत सखाराम चौधरी विद्यालय या शाळे मधील इयत्ता ५वी ते ११ वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या दलित वंचित, आर्थिक दुर्बल घटकातील गोरगरीब गरजु विद्यार्थिनींना गणवेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास म.सा.का.चे चेअरमन शरद महाजन,इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील,गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, पी एस सोनवणे, डॉ युवराज चौधरी, मुख्यध्यापक एम. के. पाटील, मुख्यध्यापक कुलकर्णी, एस.के. बाऊस्कर, डॉ. शिवदास चव्हाण, सागर देवांग यांचेसह नागरिक आदींची उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे