उद्धव ठाकरे यांचे राम मंदिरात योगदान काय? मंत्री गिरीश महाजन यांचा सवाल…
मुंबई प्रतिनिधी – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम मंदिराच्या कार्यक्रमाच्या सोहळ्याचे आमंत्रण मिळालं नसल्याने राजकारण चांगलेच तापले असून यावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचे नेते आमने सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना आमंत्रण मिळालं नाही म्हणून वाईट वाटून घेण्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया देत याबाबत सर्व निर्णय हे केंद्र सरकार घेत आहेत. व्हीआयपी यादीत जे आहेत त्यांना जे अपेक्षित आहे ते त्या ठिकाणी जाणार आहेत. म्हणून त्यांनी राज ठाकरेंना निमंत्रण दिलेले आहे आणि उद्धव ठाकरेंना नाही.
त्यामुळे त्या ठिकाणी कोण जाणार आहे आणि कोण नाही हा केंद्र सरकारचा प्रश्न आहे. जे सातत्याने राम मंदिरावर टीका करतात त्यांना आमंत्रण देण्याचे कारण काय? असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांना निमंत्रण देण्याची गरज नाहीये, त्यांचे नेमकं योगदान काय? एखादी फोटो दाखवून जनतेला त्या ठिकाणी त्यांचे योगदान दाखवावे असा खोचक टोला लगावला आहे.
तर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी राम मंदिर हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. आम्हाला निमंत्रण मिळो नको मिळो काही हरकत नाही. आमची भगवान श्रीराम यांच्यावर श्रद्धा आहे. पण भाजपने राम मंदिराचा इव्हेंट करू नये असा टीका केली आहे. त्यामुळे राम मंदिराच्या भव्य सोहळ्याआधी राज्यातील राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे.