
जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस, तालुकाध्यक्षपदी ऐश्वर्या प्रशांत साळुंखे यांची नियुक्ती. जिल्हाध्यक्षा मोनालिका किशोर पवार (पाटील) यांनी २४ रोजी सोमवारी नियुक्तीपत्र जारी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे आणि माजी मंत्री अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी पक्षाची ध्येय-धोरणे सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याचा विश्वास ऐश्वर्या साळुंखे यांनी व्यक्त केला. पक्षाच्या वतीने त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले आहे.