रावेर

श्रृंगधाम बलवाडी येथे श्रीराम दरबारासह विविध मुर्त्यांची प्राण प्रतिष्ठा संपन्न..

बलवाड़ी प्रतिनिधी -आशीष चौधरी 

बलवाडी ता.रावेर येथिल श्रृंगऋषी आश्रमात श्रीराम दरबार श्रीराम, लक्ष्मण, सितामाता, हणुमान, दुर्गामाता, महालक्ष्मीमाता, महादेव, आदिशक्ती मुक्ताई यांची मोठ्या भक्ती भावाने जल्लोषात बलवाडी गावभर दिंडी सह सर्व मुर्त्यांची मिरवणुक काढून ३ जानेवारी रोजी स्थापन करण्यात आली. यावेळी आठ जोडप्यांनी पुजा होम हवन करूण प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पुजेसाठी अभिजित महाराज खिर्डी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रा.प.स जितेंद्र महाजन व सरपंच सौ.वैशाली महाजन यांच्या जोडप्यासह सावदा येथिल महाराष्ट्र हरियाणा ट्रास्पोर्टचे संचालक श्री.राजकुमार व सौ.उर्मीला शर्मा, श्री.राजेद्र व सौ.अर्चना महाजन बलवाडी, श्री.हिरामण व सौ.सुनिता महाजन पाडळसा, श्री.गोकुळ व सौ.सुरेखा महाजन बलवाडी, श्री.भुषण व सौ.मोहिनी पाटील भुसावळ, श्री.किरण वसौ.सुवर्णा महाजन वघाडी, श्री.पिंटू व सौ.कविता भिल बलवाडी या आठ जोडप्यांच्या हस्ते पुजन करूण प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी श्रृंगधामचे अध्यक्ष भागवत महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन श्रृंगधाम व कामधेनू गो मातेविषयी सखोल माहिती देऊन येत्या २६ जानेवारी रोजी श्रृंगधाम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सालाबादप्रमाणे भव्य, दिव्य विशाल भंडाऱ्याचे आयोजन केले असून त्यासाठी सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. पत्रकार परिषदेला रावेर, वाघोदा, खिर्डी व निंभोरा सह परिसरातील पत्रकार बांधव उपस्थित होते. या वेळी बलवाडी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष महाजन, उपसरपंच संजय भिल, निंभोरा महिला दक्षता समिती सदस्य आशाताई धनगर, संजय महाजन, गोपाळ सावंत महाजन विवरा, सुभाष महाजन, वसंत महाजन, लक्ष्मण महाजन, सिताराम महाजन, भास्कर धनगर, प्रा.दिलीप सोनवणे, देवेंद्र धनगर, युवराज महाजन, हर्षल साळुंखे, मोहित येवले, प्रकाश पाटील, चेतन महाजन, क्रीष्णा महाजन, भैया महाजन, वसन महाजन आदि भाविक भक्त उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे