जळगाव

राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सजले नवजीवन प्लस.

जळगाव (प्रतिनिधी) : येत्या २२ जानेवारी रोजी संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असणार आहे. कारण या दिवशी अयोध्या येथील श्री राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देश याचा आनंद साजरा करत असतांना, आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे शहरातील नवजीवन प्लसही या उत्सवासाठी सजले आहे.

आज (दि.२०) रोजी श्रीराम प्रतिमेची शहरातील सचिन नारळे आणि सौ.अपूर्वा नारळे यांच्याहस्ते पूजा करण्यात येवून, खास प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशातील सर्वात मोठ्या उत्सवासाठी महाबचतीच्या मोठ्या ऑफर्स – बिग डे चा शुभारंभ करण्यात आला. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नवजीवन प्लसचे स्टोअर भगव्या रंगात रंगले आहे. स्टोअरला भगव्या रंगाची सजावट करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांनीदेखील भगवा गणवेश धारण केला आहे. संपूर्ण देशाच्या आनंदात सामील होण्याच्या नवजीवन प्लसच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे शहरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे