आश्रमशाळा पिंपळे बु. येथील विदयार्थ्यांना मिळाले आर्थिक साक्षरतेचे धडे….
अमळनेर – श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथमिक / यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु. ता-अमळनेर, जि-जळगाव येथे दि.20 जानेवारी 2024 वार- शनिवार रोजी मा.मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियानांतर्गत ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरतेचे धडे मिळावेत व आर्थिक जागरूकता निर्माण व्हावी यासाठी अमळनेर येथील युनियन बँकेचे जिल्हा समन्वयक श्री.उदय रमेशराव पाटील यांना तज्ज्ञ मार्गदर्शक व प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले. यासाठी वरिष्ठ शिक्षक सतीश कागणे व स्वप्निल एच.पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले. प्राथमिक मुख्याध्यापक अविनाश अहिरे व माध्यमिक मुख्याध्यापक श्री.उदय पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते शाळेतील ‘श्री चिंतामणी बचत बँकेचे’ उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा समन्वयक यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता रुजविणाच्या दृष्टीने पैशांचे नियोजन कसे करावे, गुंतवणूक कशी करावी, बँकेचे व्यवहार, कर्ज व व्याज प्रणाली, बँकेच्या विविध योजनांची माहिती इत्यादीं बाबत मार्गदर्शन केले. तसेच आर्थिक व्यवहाराकरिता यू.पी.आय.सारख्या आधुनिक साधनांचा वापर करतांना घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबत युवा विदयार्थी वर्गासाठी त्यांचे मार्गदर्शन अनमोल ठरले. सदर उपक्रमासाठी उच्च माध्यमिक शिक्षिका श्रीमती माधुरी पाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली तर श्री.गंगासागर वानखेडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्निल पाटील, दिपक नांद्रे, अविनाश पाटील यांनी मेहनत घेतली तर राहुल पाटील, प्रतिक पाटील, हितेश पवार यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई पाटील, सचिव नानासो युवराज पाटील तसेच मा.मुख्याध्यापक यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले. या आयोजित आर्थिक साक्षरता उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकंदरीत असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरित ठरले.