गुन्हेगारीजामनेर

भरदिवसा दीड लाखाची चोरी फत्तेपुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल

जामनेर प्रतिनिधी- कृष्णा पाटील

जामनेर – तालुक्यातील तोरणाळे येथील शालिग्राम त्रंबक पाटील हे काईमचे रहिवाशी असून सेवानिवृत्त शिक्षक आहे ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पुण्याला असलेल्या मुलाकडे राहायचे परंतु काही कामानिमित्त दोन तीन महिन्यातुन घरी येत होते त्याचप्रमाणे आज दि.९ /०२/२०२४ रोजी शिक्षक घरी येताच त्यांना आपल्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले त्यानंतर त्यांनी घरामध्ये गेल्यानतर त्यांना देवघर, टी.वी शोकेश,गोद्रेज कपाटामध्ये असलेले मौल्यवान वस्तू जसे की सोन्याची अंगठी,सेवन पिस, रोक रक्कम आदाजे दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत चोरांनी लाबवल्याचे निर्दशनास आल्यावर त्यांनी तात्काळ नव्यानेच मंजूर झालेले फत्तेपूर पोलीस स्टेशन गाठून स.पो.निरीक्षक गणेश फड यांच्याशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार सांगितला साहेबांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन घडलेल्या सर्व प्रकार लक्षात घेता.बीट अमलदार दिनेश मारवडकर व जवरे यांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे कारण या अगोदर परिसरात बऱ्याच ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत.हनुमान मंदिराची दांनपेटी, देऊळगाव व पळसखेडा काकर येथील शेतकऱ्याचे ठिबक, गाय, बैल, मोटरसायकल, एवढेच नव्हे ,तर शेतकऱ्यांनी शेतातून तयार करून आणलेला शेतमाल सुद्धा चोरीस गेलेले आहेत.

आजपर्यंत या अज्ञात चोरांच्या मुसक्या मात्र आवरल्या गेल्या नाहीत जर असेच गावागावात जनतेचा मौल्यवान वस्तू व शेतकऱ्यांचा शेतमाल चोरीला जात असेल तर शेतकऱ्यांनी व जनतेने करावं तरी काय? हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून संपूर्ण परिसरामध्ये चोरांची भीती पसरल्याचे दिसत असून आज त्याची चोरी झाली उद्या आपली होईल की काय असा धक्का सर्वसाधारण शेतकरी वर्गामध्ये पोहोचलेला आहे त्यामुळे फत्तेपूर येथील स.पो. निरीक्षक यांनी लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घेऊन त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा.अशी मागणी परिसरातील जनतेकडून व शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे संपर्क करा
WhatsApp Group