चोपडा – तालुक्यात एका कारमधून ३ गावठी कट्टे व ८ जिवंत काडतूसा सह तिघांना चोपडा ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख ८२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुधगाव येथे एका कारमधून काही जण अंधाराचा फायदा घेत ३ गावठी कट्टे आणि ८ जिवंत काडतूस घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली .त्यानुसार पथकाने २३ रोजी मध्यरात्री २ वाजता चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे सापळा रचला. त्यावेळी पोलिसांनी कार क्रमांक (एमएच-१२ आरएफ १४९६) ही कार थांबविली. कारची झाडाझडती घेतली असता ३ जणांकडून ३ गावठी कट्टे आणि ८ जिवंत काडतूस आढळून आले. पोलीसांनी तिघांना अटक केली. पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेली कार, ३ गावठी कट्टे आणि ८ जिवंत काडतूस असा एकुण ८,८२,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जफर रहीम शेख वय-३३, तबेज ताहीर शेख व-२९ आणि कलीम अब्दुल रहमान सय्यद वय-३४ तिघे रा. शिरूर जि.पुणे यांच्याविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, डीवायएसपी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक कावरी कमलाकर, पोलीस नाईक शशिकांत पारधी, पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण धनगर, सहायक फौजदार राजू महाजन, देविदास ईशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पारधी, विनोद पवार, महेंद्र भिल, संदीप निळे, श्रावण तेली, संजय चौधरी यांनी केली.