जामनेर तालुक्यात मंजूर झालेल्या विविध कामांचे भूमिपूजन..
जामनेर- प्रतिनिधी कृष्णा पाटील
जामनेर – तालुक्यातील तोरणाळे येथे मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाप्रसंगी मा.ना.गिरीश भाऊ महाजन (ग्रामविकास मंत्री) यांच्या अर्धांगिनी सौ.साधनाताई महाजन, व श्री जे. के. चव्हाण रावसाहेब (काका), मा.प.स. सदस्य श्री नवलसिंग पाटील, सा.बां. उपविभागाचे शाखा अभियंता श्री नितीन जैस्वाल, हे सर्व मान्यवर उपस्थित असून यावेळी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून सौ.साधनाताई महाजन यांचा सत्कार तोरणाळे येथील लोकनियुक्त सरपंच सौ. अंजनाबाई ईश्वर पाटील तर श्री जे. के. चव्हाण रावसाहेब यांचा सत्कार राजू पाटील तसेच नवलसिंग पाटील यांचा सत्कार उपसरपंच मा. डॉ. जितेंद्र बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कार समारंभाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नवलसिंग पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी बोलताना त्यांनी मा.ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या ग्रामनिधी खात्यातून विकास कामांसाठी मंजूर झालेला निधी तोरणाळे येथे फ्लेवर ब्लॉक १० लाख रु., रस्ता व गटार १५ लाख रु. सभा मंडप १५ लाख रु. व्यायाम शाळा ३० लाख रु. तोरणाळा ते घाणेगाव शेत रस्ता २० लाख रु. अभ्यासिका २५ लाख रु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १० लाख रु. मागासवर्गीय २० लाख रु. तसेच जूनोने येथे सभा मंडप ३५ लाख रु. व्यायाम शाळा ३० लाख रु. फ्लेवर ब्लॉक १० लाख रु.,काँग्रेट रस्ता १० लाख रु. जुनोने ते गोरनाळा एक कोटी पंचवीस लाख रु. तर पठाड तांडा येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून अंदाजे ऐकून ४ कोटी रु. निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच मंजूर झालेल्या कामांचे मान्यवरांच्या हातून भूमिपूजन करण्यात आले असून या सर्व कामांचे टेंडर मादणी येथील प्रतीक पाटील व फत्तेपूर येथील यश जैन यांना देण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले मात्र मा.प. स. सदस्य नवलसिंग पाटील यांनी काम अतिशय चांगल्या दर्जाचे व अंदाजपत्रकानुसारच झाली पाहिजेत काम करीत असताना कामा संदर्भात कोणत्याही ग्रामस्थांची तक्रार संबंधितांकडे जायलाच नको असे सुद्धा त्यांनी भूमिपूजनाप्रसंगी बोलत असताना सांगितले त्यावेळी गावातील ग्रामस्थ मंडळी, ग्रामपंचायत सदस्य, तसेच परिसरातील पठाड तांडा, वसंत नगर, जुनोना येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असून भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम अतिशय शांततेत पार पडल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसून आले आहे.