माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या तक्रारीची दखल;तारखेड्यांच्या सरपंचा वर गुन्हा दाखल
तोरणाळे (प्रतिनिधी)- कृष्णा पाटील
पाचोरा :तारखेडा (खूर्द) ता.पाचोरा येथील गावातील गौणखनिजांची लूट होत असल्याचा प्रश्न विचारला म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते पंकज पाटील यांना भर ग्रामसभेत सरंपच व अन्य ४ यांनी मारहाण केली होती.या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यामुळे पंचक्रोशीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की तारखेडा येथे बी.एल इन्फ्रा कंपनीने गौणखनिज उत्खणण व वाहतूक प्रकरणी नियमबाह्य व कायदा धाब्यावर बसवून लूट चालविली असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पाचोरा तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांनी केला होता.या प्रकरणी त्यांनी महसूल विभागाकडे तक्रार करून कंपनीच्या विरोधात जप्ती पंचनामा व वसूलीभरणा नोटीसा काढायला भाग पाडले होते.तसेच संबंधीत गौणखजिन उत्खणनासंबंधी ग्रामपंचायतीचे नाहरकत पत्र व ग्रामसभा व मासिकसभा ठराव इत्यांदी कागदपत्रे मागीतली होती.ही कागदपत्रे जर उघड झाली तर सरपंचाच्या कारभाराचे पितळ उघड होणार होते. याचा राग मनात ठेवून ३१ नोब्हेंबर २०२३ रोजीच्या ग्रामसभेत संरपच व ज्यांचे या प्रकरणी हितसंबंध गुतंले अशा अन्य काही लोकांनी कार्यकर्ते पंकज पाटील यांच्यावर भर ग्रामसभेत मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.या प्रकरणी पंकज पाटील यांनी पोलीस अधिक्षक जळगांव यांचेकडे लेखी तक्रार केली होती. सदर प्रकरणी पोलीस अधिक्षक यांचे आदेशानुसार पाचोरा पोलीसांनी तारखेडाच्या संरपच ,सरपंच पती राजेंद्र पाटील,सचिन पाटील,मधूकर पाटील व उपसरंपच सुनिल नाईक यांचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.