राजभाषा मराठी दिनानिमित्त नथमल हजारीमल राका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोदवड येथे सर्जनशील निंबध स्पर्धा
जामनेर प्रतिनिधी – संजय जटाळे
बोदवड येथे दिनांक २७ फेब्रुवारी रोजी वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त राजभाषा दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त न ह रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोदवड येथे शनिवार दिनांक २४/०२/ २०२४ रोजी इयत्ता पाचवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांची गटनिहाय निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पाचवीचे २७ वि. सहावीचे ४३ वि.सातवीचे २८ वि. आठवीचे ३७ वि. नववीचे २३ वि. व तसेच अकरावीचे २३ असे एकूण १८३ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थी सहभागी झाले या विद्यार्थ्यांना वेळेवरच विषय देण्यात आले.
पाचवीसाठी विषय माझी आई किंवा माझ्या चांगल्या सवयी ,इयत्ता सहावीसाठी मला आवडलेली व्यक्ती किंवा माझा गाव, इयत्ता सातवीसाठी मला आवडलेली गोष्ट किंवा माझे आजी – आजोबा, आठवीसाठी माझी मातृभाषा मराठी किंवा मला आवडलेली कविता*, इयत्ता नववीसाठी व रयतेचे राजे छत्रपती शिवराय किंवा थोर महाराष्ट्र भूमी ,अकरावीसाठी इंग्रजीत हरवलेली मराठी भाषा किंवा मी व मोबाईल. असे विषय ऐनवेळी देण्यात आले.
विद्यार्थ्यांची कल्पना शक्ती व सर्जनशीलतेला वाव मिळावा असा हेतू या स्पर्धेचा होता.या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक श्री पी एम पाटी,ल सर व सर्व प्रशासनाने विद्या र्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत प्रत्येक गटात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र, द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्याना पेन व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.ही सर्व बक्षीस व प्रमाणपत्र गं.भा. मातोश्री लीलाबाई मधुकर चौधरी यांच्या स्मरणार्थ राजभाषा गौरव दिनी दि.२७/०२/२०२४ रोजी देण्यात येणार आहे. निबंध स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख डी .एम.चौधरी , तसेच एस सी गुरव,एस के राणे, ए आर पाटील, डॉ व्ही बी सिसोदे, एस आर सावळे, जी बी भोई, एस एच सत्रे, एन यु बागुल सर, मराठे मॅडम या सर्वांनी सहकार्य केले.