श्री संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सव समिती बोदवड द्वारा आयोजित श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह ला सुरूवात..
बोदवड – प्रतिनिधी संजय जटाळे
बोदवड येथे श्रीमद्भागवत कथावाचक श्री अनंत विभूषित १००८ श्री माननीय सद्गुरु स्वामी सुदर्शनाचार्य जी महाराज, डभोई (गुजरात) यांचे संगीतमय श्रीमद् भागवत कथा वाचक यांच्या मधुर वाणीतून बोदवड नगरी त कथा ऐकण्यासाठी भाविकांनी बोदवड येथील गजानन महाराज मंदिर येथे सुसज्ज असे वातावरणात बाबांच्या मधुर वाणीतून ऐकवयास मिळणार आहे गजानन महाराज प्रकट दीन समितीमार्फत सांगण्यात आले मंदिराचे संयोजक श्री अनंत भाऊ कुलकर्णी अध्यक्ष अनिल खंडेलवाल व श्री सुहास गर्गे महाराज यांनी भाविक भक्तांना आवाहन केले की आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करूया गजानन महाराज मंदिरात बोदवड तालुक्यातील सर्व भाविक मंडळी उत्साहाने सप्ताह साजरा करीत असतात बोदवड तालुक्यातील ५१ गावावरून भाविक मंडळी कथा श्रवण व कीर्तन ऐकण्यासाठी येत असतात उत्सव समितीमार्फत अकरावे वर्ष प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतो गजानन महाराज मंदिर ट्रस्ट च्या वतीने रक्तदान शिबिर घेतले जाते , नेत्र चिकित्सा तपासणी शिबीर, संस्थेतर्फे विविध सामाजिक कार्यक्रम ठेवलेले आहे,
२५/०२/२०२४ ते ३/३/२०२४ पर्यंत श्री. अनंत विभूषित १००८श्री सद्गुरू स्वामी सुदर्शनाचार्य जी महाराज यांच्या मधुर वाणीतून श्रीमद भागवत कथा श्रवण करावी.
२५ फेब्रुवारी रविवार रोजी रात्रीचे कीर्तन ह .भ .प. अमोल महाराज घुगे नागपूर
२६ फेब्रुवारी सोमवार रात्रीचे कीर्तन ह भ प शिवाजी महाराज झांबरे बरफगाव
२७ फेब्रुवारी मंगळवार किर्तन ह.भ.प. पोपट महाराज पाटील कासार खेड
२८ फेब्रुवारी बुधवार किर्तन ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर जळगाव.
२९ फेब्रुवारी गुरुवार कीर्तन ह.भ.प. भरत महाराज पाटील म्हैसवाडी
१ मार्च शुक्रवार कीर्तन ह.भ. प. समाधान महाराज भोजेकर जळगाव
२ मार्च शनिवार किर्तन ह.भ.प. श्री विश्वनाथ महाराज कोल्हे दिंडोरी
३ मार्च रविवार किर्तन ह.भ.प.श्री गुरुवर्य रवींद्र महाराज हरणे मुक्ताईनगर व तसेच श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सव समितीतर्फे सात दिवस नित्यनेमाने रोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती,त्याच प्रमाणे
रोज दुपारी कथा ह.भ. प. श्री सद्गुरु स्वामी सुदर्शनाचार्य जी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून ठीक १२:३० ते ५ वाजेपर्यंत राहील,
रोज संध्या काळी ठीक ५ ते ६ हरिपाठ घेण्यात येईल हरिपाठा सर्व तरुण मित्र, बालगोपाल व महिला भजनी मंडळ यांनी उपस्थित राहून पावल्या, फुगडी चा आनंद घ्यावा.
व तसेच कीर्तन ठीक रात्री ८ ते १०
श्रीमद् भागवत कथा ग्रंथ दिंडी मिरवणुक सोहळा २ मार्च २०२४ रोजी दुपारी २ ते ५ श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सव समिती तर्फे सर्व भाविक भक्तगणांसाठी कीर्तनाची मुक्कामी व्यवस्ता आणि भोजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच बोदवड तालुक्यातील ३५० स्वयंसेवक दरवर्षा प्रमाणे आपल्या तन-मंन धनाने या कार्यक्रमात सहभागी होतात. समितीतर्फे तरुण,बाल,वृध्द,महिला भाघिनिना व सर्व भक्तगण बोदवड वाशियाना आव्हान करण्यात आले आहे की आपण सर्वांनी याही वर्षी अकरावे वर्ष स्वयंस्पृतिने मनाने आपले कार्य आपण पार पाडावे. जय गजानन, श्री गजानन, “गण गण गणात बोते” अशा जयघोषासह आवाहन करून पंचक्रोशीतील भक्तगणांना आमंत्रित करण्यात आले आहे.