सावळदबारा येथे चक्रधर स्वामींच्या यात्रेनिमित्त यात्रेकरू व भक्तांना अन्नदान..
सोयगाव प्रतिनिधी – संजय जटाळे
नजीकच असलेल्या सोयगाव तालुक्यातील – सावळदबारा येथे भगवान श्री चक्रधर स्वामी यांची भव्य अशी मोठी यात्रा दांडी पौणिमा दिनांक २३ रोजी मंदिर परिसरात कलियुगातील परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामीचे सावळदबारा या ठिकाणी चक्रधर स्वामींचे एकवीस दिवस वास्तव होते.याच भगवान श्री चक्रधर स्वामी यांची भव्य अशी मोठी दांडी पौणिमा दि.२३ फेब्रुवारी या दिवशी यात्रा साजरी करण्यात आली. तीर्थक्षेत्र जाळीचा देव, सावळदबारा व (जयदेवाडी) येथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभुंच्या पदस्पर्शाने पुनित पावन झालेले स्थळ आहे.
या दिवशी माघ शु. पौ १४ दुपारी ३.३३ मि प्रारंभ होत असून दिनांक २४ फेब्रुवारी सांय ०५.५९ मि. पर्यंत आहे. प्रती वर्षाप्रमाणे या वर्षी यात्रेच्या निमित्ताने सावळदबारा येथे मधुकर पुजारी यांच्या तर्फे दर्शनासाठी आलेल्या भक्तांना अन्नदान ठेवण्यात आलेले आहे अन्नदानाचा लाभ हजारो भक्तांना व्हावा म्हणून अन्नदानाचे आयोजन मधुकर पुजारी गोपीनाथ पुजारी राहुल पुजारी सुमन ताई यांच्यातर्फे चांगले सहकार्य लाभले आहे यात्रेनिमित्त
फरदापुर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे व पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे तसेच सावळदबारा पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी अमलदार भरत कोळी प्रकाश कोळी व फरदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी मंदिर परिसरात तसेच पार्किंग परिसरात बॅरिगेट लावून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून यात्रेला येणाऱ्या संपुर्ण भक्तगणांचे यात्रे निमित्त समस्त पुजारी मंडळी तसेच सावळदबारा येथील ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले आहे.