गुन्हेगारीब्रेकिंगभुसावळ

मसाज पार्लरच्या नावावर वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा…

भुसावळ –  दि. 03 रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी  कृष्णात पिंगळे यांना महेश नगर भागात माइंड अॅण्ड बॉडी स्क्रीन केअर स्पा या नावाखाली कुंटणखाना चालवित असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यावरुन भुसावळ येथिल महेश नगर भागात विशाल शांताराम ब-हाटे व त्याची पत्नी पल्लवी विशाल ब-हाटे असे स्पा व बॉडी स्क्रीन केअर व्यवसायाच्या नावा खाली स्वतःच्या घरात आर्थिक फायद्या करीता महिलांना पैशाचे अमिष देवुन, देह व्यापारास प्रवृत्त करुन त्यांचे कडून देह व्यापार करुन घेतात.

अशी गुप्त बातमी मिळाल्याने  छापा टाकला असता देह व्यापार चालविणारे विशाल शांताराम ब-हाटे, व त्याची पत्नी दोन्ही रा. महेश नगर, भुसावळ व देह व्यापार करणाऱ्या पिडीत पाच महिला करमाळा, जि. सोलापुर, ह. मु. मगरपट्टा पुणे, जामखेड, जि. अहमदनगर, पहुर, ता. जामनेर, जि. जळगांव, पिंपरी चिंचवड, पुणे, कुलाबा, मुंबई व येथील राहणा-या व दोन इसम मिळुन आले आहेत. सदर ठिकाणी देह व्यापारास लागणारे साहित्य मिळून आले माहे. सदरचे ठिकाण हे रहीवाशी वस्ती मधिल असुन ब-हाटे पती पत्नी हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी व महिलांना पैश्याचे अमिष देवुन देहव्यापारास प्रवृत्त करुन त्यांचे कडून देह व्यापार करुन घेत होते. अश्या प्रकारचे अनैतिक व्यापार व असमाजीक कृत्य करणारया इसमा विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात आली.

पोलीस अधिक्षक जळगांव अपर पोलीस अधिक्षक जळगांव यांचे मार्गदर्शना खाली उप विभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे , सपोनि  रुपाली चव्हाण, सपोनि सुदर्शन वाघमारे, मसफौ शालीनी वलके, सफौ प्रदिप अभिमन्यु पाटील, मपोहेकों अश्विनी जोगी, पोहेकों अनिल गणपत झुंझारराव  यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे