जळगाव

ओरिएंट सिमेंट लिमिटेड यांच्या सी.एस.आर.अंतर्गत आणि रेडक्रॉस आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

जळगाव – ओरिएंट सिमेंट लिमिटेड यांच्या सी.एस.आर अंतर्गत आणि इंडियन सोसायटी जळगाव यांच्या सहकार्याने जळगाव खुर्द, या ठिकाणी दोन दिवसीय आरोग्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आज शिबिराच्या पहिल्याच दिवशी आरोग्य तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी ७५ जेष्ठ नागरिकांचे शुगर व ब्लड प्रेशर तपासणी, १०७ विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी, ७२ सर्व महिलांची हिमोग्लोबिन तपासणी हि करण्यात आली या व्यतिरिक्त सर्व स्पेशालीस्ट डॉक्टरांनी विविध आजारांच्या २०८ तपासणी करून रुग्णांना औषधी ही दिली.

या तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ओरिएंट लिमिटेडचे एच.आर. विभाग प्रमुख रोहित जोशी यांनी प्रास्ताविक करताना सांगितले कि, ओरिएंट सिमेंट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत विविध उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून जळगाव खुर्द येथील ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भविष्यातही असेच सामाजिक उपक्रम राबवले जातील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या तपासणी शिबिरासाठी स्त्रीरोग तज्ञ डॉ. नंदा जैन, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गौरव बाफना, दंतरोगतज्ञ डॉ. देवेंद्रप्रताप सिंग, कान नाक घसा तज्ञ डॉ. अरविंद चौधरी, डोळे तपासणी तज्ञ डॉ. उल्हास तासखेडकर जनरल फिजिशियन डॉ. प्रकाश महाजन या डॉक्टरांनी सेवा दिली. त्यांच्या या सेवेसाठी सर्वांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी ओरिएंट सिमेंटच्या अकाउंट विभागाचे जनरल मॅनेजर प्रमोद शर्मा, एच. आर. विभाग प्रमुख रोहित जोशी, तसेच एच.आर.विभागाचे सुदर्शन मोरे, रीमा पिळगावकर मॅडम, प्रशासकीय विभागाचे टी. श्रीनिवास, सुरक्षा विभागाचे प्रमुख  प्रदीप पानसे, जळगाव खुर्दचे उपसरपंच  दिनेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य  गोकुळ सुरवाडे, ग्रामसेवक सुनील सरदार, रेडक्रॉस चेअरमन श्री.विनोद बियाणी, रक्तकेंद्राचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा व मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे