ग्रामसेवकाला व प्रशासनाला कंटाळून गोदरी गावच्या सरपंचांचे पंचायत समिती समोर उपोषण
गेल्या नऊ वर्षांपासून गोदरी ग्रामपंचायतला गोचीडासारखे चिटकलेल्या ग्रामसेवकाची तात्काळ बदली करा सरपंच
जामनेर – प्रतिनिधी संजय जटाळे
जामनेर तालुक्यातील गोदरी येथे सरपंच पदावर असलेल्या मंगलाबाई भगवान पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिकांनी कुठल्याही विकास कामांच्या संदर्भात ग्रामसेवकाला विचारपूस केली असता ग्रामसेवक फक्त उडवा उडूची उत्तरे देऊन विकास कामांकडे कानाडोळा करीत असतात यांच्यावर वरिष्ठांचा दबाव असतोयाचे कारण असे आहे की, गोदरी ग्रामपंचायतची निवडणूक होऊन ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांनी बाजी मारलेली आहे परंतु तालुक्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची सत्ता असल्यामुळे गोदरी ग्रामपंचायतकडे हेतू पुरस्कार दबाव टाकून विकास कामांना थांबवलं जात आहे असेही गोदरी ग्रामपंचायतच्या सदस्य तसेच इतर वक्त्यांनी बोलताना सांगितले आहे त्याचप्रमाणे गावातील घरकुल योजना सार्वजनिक स्वच्छालय 15 वित्त आयोग पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना शबरी योजनेचे प्रस्ताव रमाई आवास योजना मोदी आवास योजना या सर्व योजनांचे प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या मार्फत पूर्ण करून दिले असताना सुद्धा लाभार्थ्यांना अजूनही पहिल्या हप्त्याची रक्कम मिळत नाही तसेच गावातही काहीही विकासकाम करण्याच्या उद्देशाने ग्रामसेवकाला सांगितले असता ग्रामसेवक सुद्धा लक्ष देत नाही दिल्या नऊ वर्षांपासून एकच ग्रामसेवक गोदरी ग्रामपंचायतला चिटकलेला आहे गावात विकास काम मात्र झिरो प्रमाणात असून त्याच्यावर पंचायत समिती जामनेर यांचे अतिशय दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतच्या सदस्यांसह सरपंच तसेच गावातील ग्रामस्थ यांच्यावतीने अनेक वेळा पंचायत समितीला अर्ज निवेदन देऊन आमच्या कामांना कुठलीही गती मिळालेली दिसत नसल्यामुळे आम्ही उपोषणाचा मार्ग निवडलेला आहे कारण जामनेर तालुक्यामध्ये ग्राम विकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची सत्ता आहे आणि गोदरी ग्रामपंचायतीवर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवलेला आहे त्यामुळेच आमच्या ग्रामपंचायतकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष केले जात आहे आणि आमच्या कामांवर दबाव आणला जात आहे असे सुद्धा गोदरी ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य व ग्रामस्थांनी बोलताना सांगितले असून जोपर्यंत गोदरी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांची बदली करून आम्हाला दुसऱ्या ग्रामसेवक मिळत नाही तसेच आमच्या मागण्या सुद्धा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असे सुद्धा आवाहन गोदरी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेले आहे तसेच या उपोषणाला जामनेर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवल्याचे दिसून आले आहेत.