ब्रेकिंग

भवरखेड येथील राईस मिलवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई..

७८.६३ लाखांचा २ लाख ९६ हजार किलो तांदूळाचा संशयास्पद साठा जप्त..

जळगाव : पाचोरा तालुक्यातील भवरखेड येथील मे. श्री महासर माता राईस मिल येथे अन्न व औषध प्रशासनाने अचानक तपासणी करत तब्बल २,९६,४७६ किलो तांदळाचा ७८ लाख ६३ हजार १५० रुपये किमतीचा संशयास्पद साठा जप्त केला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या फोर्टीफाइड तांदळाचाही समावेश आहे.

दि. ७ ते ९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत भोकरी, वरखेडी-पिंपळगाव रोड आणि भवरखेड परिसरातील राईस मिलची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सहा अन्न नमुने घेतले असून जप्त केलेल्या साठ्याची पुढील तपासणी सुरू आहे.

जप्त साठ्यामध्ये ६४,५४६ किलो फोर्टीफाइड राईस, १,३७,९९६ किलो ब्रोकन राईस, १,९९६ किलो विनालेबल प्लेन राईस, ३,४४६ किलो मिसब्रँडेड ब्रोकन राईस, ८१,४९६ किलो ‘Gustolo’s’ एक्सपोर्ट राईस आणि ६,९९६ किलो मलेशिया एक्सपोर्टसाठीचा राईस यांचा समावेश आहे.

राईस मिलमध्ये अस्वच्छता : खरेदीची बिलेही सादर नाहीत

तपासणीदरम्यान मिलमध्ये उंदराची विष्ठा, धूळ, जाळे आढळून आली. तसेच तांदूळ जमिनीवर साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. काही तांदळाच्या पोत्यांवर उत्पादकाचा पत्ता नमूद नसल्याचे, तर संबंधित तांदळाच्या खरेदीची बिले सादर करण्यात आली नसल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या सर्व बाबींवरून अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधाची चौकशी

सदर आस्थापना केंद्रीय अन्न परवानाधारक असल्याने या कारवाईची माहिती केंद्रीय अन्न परवाना प्राधिकरणाला देण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेला फोर्टीफाइड तांदूळ महाराष्ट्राच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित आहे किंवा नाही, याबाबत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सखोल तपास सुरू आहे.

सदर कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे