महाराष्ट्र
कासार शिरसीसह परिसरात आमदार अभिमन्यू पवार यांच्या विजयाचे फटाके फोडून जल्लोषात स्वागत..
प्रतिनिधी – चंद्रशेखर केंगार
लातूर – औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या विजया निमित्य कासार शिरसीसह मदनसुरी कासार बालकुंदा सरवडी या भागातील नागरिकांनी त्यांच्या विजया निमित्त ठिकठिकाणी फटाके फोडत विजयी मिरवणुका काढत जल्लोष साजरा केला
कासार शिरसी सह या भागातील 68 गावात आमदार पवार यांना या निवडणुकीत मतदारांनी अभूतपूर्व सहकार्य केले त्यांच्या विजयानिमित्य कासार शिरशी शहरात कार्यकर्त्यांनी शहरातून विजयी मिरवणूक काढली यात कासार शिरसी शिरसी वाडी कोराळी कोराळवाडी येथील तरुणांनी आपला सहभाग नोंदवत जल्लोष केला
हा केवळ आमदार पवार यांचा विजय नसून या भागातील विकास कार्याचा विजय असल्याची भावना याप्रसंगी अनेकांनी व्यक्त केली