रावेर
भाजपाचे उमेदवार अमोल जावळे यांच्या विजयाचे फटाके कुसूंबे गावात गुलाल उधळत जल्लोष साजरा..
(रावेर – प्रतिनिधी हमीद तडवी)
रावेर यावल विधानसभा चे उमेदवार अमोल जावळे यांच्या विजयानिमित्य कुसुंबा ता रावेर या गावात नागरिकांनी अमोल जावळेंच्या विजया निमित्त गावात ठिकठिकाणी गावात फटाके फोडत विजयी मिरवणुका काढत जल्लोष साजरा केला. अमोल जावळे यांना या निवडणुकीत मतदारांनी अभूतपूर्व सहकार्य केले.
त्यांच्या विजयानिमित्य कुसुंबा बु. गावात कार्यकर्त्यांनी गावातुन विजयी मिरवणूक काढली यात कुसुंबा येथील तरुणांनी आपला सहभाग नोंदवत जल्लोष केला
हा केवळ अमोल जावळे यांचा विजय नसून या कुसुंबा गावातील विकास कार्याचा विजय असल्याची भावना याप्रसंगी अनेकांनी व्यक्त केली.